Tips for skin : सुंदर दिसायचंय, महागड्या ट्रीटमेंटला करा बाय, वापरा या सोप्या टिप्स..

Published on -

Tips For Skin : सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. आपली त्वचा चमकदार आणि सुंदर दिसावी यासाठी आपण अनेक ट्रीटमेंट घेतो. मात्र फक्त पार्लरच्या ट्रीटमेंटमुळे नाही तर घरगुती उपायांनीसुद्धा तुम्ही आपली त्वचा सुंदर आणि चमकदार बनवू शकता. जाणून घ्या या घरगुती उपायांबद्दल.

आपल्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स म्हणजेच मृत पेशी काढण्यासाठी घरी स्क्रब बनवा, यासाठी 2 चमचे बदामाच्या तेलामध्ये तेल, 1 चमचा बार्लीचे पीठ आणि थोडे मध एकत्र करावा. आपण अंघोळीला जाण्यापूर्वी ही पेस्ट आपल्या त्वचेवरती लावून घ्यावी. आणि यानंतरया पेस्टने आपल्या संपूर्ण शरीरावरती हलक्या हाताने स्क्रब करावे. दरम्यान, हे स्क्रब आपल्या हातांनी केल्यास अधिक फायदेशीर राहील. यानंतर दहा मिनिटांनी अंघोळ करावी.

दरम्यान, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपल्या चेहऱ्याचे दररोज क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझेशन करणे गरजेचे असते. यासाठी आपण घरात सहज सापडणाऱ्या बेसन, हळद आणि दही किंवा गुलाबपाणी यांनी बनवलेला फेस मास्क वापरू शकतो. याने आपली त्वचा चमकदार आणि सतेज बनते. दरम्यान, या मास्क नंतर चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर नक्की लावावे.

दरम्यान, अनेकांना आपला चेहऱ्याची ठेवणं आवडत नसते. यामुळे आपला फेसलिफ्ट करण्यासाठी सर्जरीचा पर्याय निवडला जातो. मात्र आपल्या चेहऱ्यामध्ये बदल हवे तुम्ही सर्जरी ऐवजी फेस मसाजचा पर्याय वापरावा. नियमित फेस मसाजमुळे आपल्या चेहऱ्यामध्ये फरक दिसू लागेल. यासाठी बदामाच्या तेलाने आपल्या चेहऱ्याचा मसाज करावा. फेस मसाजमुळे आपली त्वचा तरुण राहण्यास मदत होते .

आपली त्वचा चमकदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी हसणे हा एक सर्वोत्तम उपाय आहे. दरम्यान, हसल्यामुळे आपल्या त्वचेचे स्नायू स्मित चेहऱ्याच्या 42 स्नायूंना सक्रिय करते. दरम्यान, हसल्यामुळे सेरोटोनिन नावाचे केमिकल ऍक्टिव्ह होते. ज्यामुळे मूड चांगला होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News