पत्नीत हे गुण असतील, तर समजा तुम्ही भाग्यवान आहात; गरुडपुराणात सांगितलेत ‘हे’ गुण

Published on -

हिंदू धर्मात पती-पत्नीमधील नाते खूप पवित्र मानले जाते. पती-पत्नीमधील नाते हे परस्पर समजूतदारपणा आणि विश्वासावर अवलंबून असते, असे मानले जाते. हिंदू धर्मात पत्नीला घरातील लक्ष्मी मानले जाते. पत्नीमध्ये चांगले गुण असतील, तर ती घराला स्वर्ग बनवते. पत्नीला नेहमी आनंदी ठेवावे, असाही एक समज आहे. तुमची पत्नी आनंदी असेल, तर तुमच्या घरात आनंद राहील. धनाची देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करील, अशी एक मान्यत आहे. आता चांगली पत्नी कोणती? हा प्रश्न पडतो. गरुड पुरुणात चांगल्या पत्नीबाबत चार समजूती सांगितल्या आहेत.

काय सांगते गरुड पराण?

घरातील पत्नी ही आपली लक्ष्मी असते. परंतु चांगली पत्नी कशी समजायची? याबाबत गरुड पुराणात काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्या उल्लेखावरुन आपण आपल्या पत्नीतील चांगले गुण ओळखू शकतो. जर एखाद्या व्यक्तीच्या पत्नीमध्ये हे गुण असतील तर असे मानले जाते की पती खूप भाग्यवान आहे. पत्नीचा कोणता गुण पतीला भाग्यवान बनवतो ते जाणून घेऊ.

धर्माचे पालन करणारी

गरुड पुराणानुसार पत्नी धर्माची अनुयायी असेल, तर ती नेहमीच तिच्या पतीच्या आणि कुटुंबाच्या हिताचा विचार करते. ती फक्त असेच काम करते, जे तिच्या पतीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी चांगले असेल. गरुड पुराणात असे म्हटले आहे की, जी पत्नी दररोज स्नान करते, पतीसाठी कपडे घालते, कमी खाते, कमी बोलते आणि धर्मानुसार वागते. अशी पत्नी तिच्या पतीसाठी खूप भाग्यवान असते.

पतीचे मन जाणणारी

गरुड पुराणानुसार, जी पत्नी आपल्या पतीच्या म्हणण्यानुसार वागते, ती तिच्या पतीसाठी खूप चांगली मानली जाते. असे मानले जाते की अशा बायका चुकूनही त्यांच्या पतींना दुखवत नाहीत. ती तिच्या पतीला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. असे मानले जाते की अशा बायका दुसऱ्या कोणत्याही पुरुषाबद्दल विचार करत नाहीत.

गोड बोलणारी बायको

गरुड पुराणानुसार, जी पत्नी आपल्या पतीशी नेहमी गोड बोलते आणि पतीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, अशा पत्नी आपल्या पतींसाठी भाग्यवान असतात. असे मानले जाते की अशा बायका त्यांच्या पतींच्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या मनात स्वतःबद्दल प्रेम निर्माण करतात.

कुटुंबाची काळजी घेणारी पत्नी

गरुड पुराणानुसार, जी पत्नी आपल्या पतीची तसेच घरातील सर्व सदस्यांची योग्य काळजी घेते. जर ती पाहुण्यांना आदराने आणि आदरातिथ्याने वागवत असेल, तर असे गुण असलेली पत्नी भाग्यवान असते. अशी पत्नी समाजात पतीचा मान आणि सन्मान राखते असे मानले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News