Budh Gochar 2024 : बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध ग्रहाचे मित्र सूर्य आणि शुक्र आहेत. तर मंगळ आणि चंद्र हे शत्रू ग्रह आहेत. बुध हा कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे, अशातच बुध जुलैमध्ये आपल्या मित्र ग्रहाच्या सूर्याच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
तर 19 जुलै रोजी कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. बुधच्या या राशीबदलाचा फायदा सर्व राशींना होणार आहे, पण अशा काही राशी आहेत ज्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
मेष
बुध ग्रहाचे हे राशी बदल मेष राशीच्या लोकांसाठी वरदान ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. करिअरच्या बाबतीत उत्तम संधी मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बॉसकडून प्रशंसा मिळेल. व्यवसायासाठीही हा काळ शुभ आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण वरदान ठरेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. धैर्य वाढेल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. मात्र, आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
तूळ
तूळ राशीच्या लोकांवरही या संक्रमणाचा शुभ प्रभाव पडेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायातही फायदा होईल. विक्री, सेवा आणि विपणनाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. उत्पन्न वाढेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांवरही बुध ग्रहाच्या विशेष आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. तुम्ही विवाहाचे नियोजन करत असाल तर हा काळ उत्तम राहील. वैवाहिक संबंधही आनंदी राहतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्हाला पदोन्नती मिळू शकते, व्यावसायिकांसाठीही हा काळ उत्तम राहील.