अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वापरून आपण अनेक देशांमध्ये वाहने चालवू शकतो. परंतु प्रत्येक देशामध्ये यासाठी वेगवेगळे नियम व अटी आहेत. त्याचे पालन करून आपण या देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर ड्रायव्हिंग करू शकतो.
अमेरिकेमध्ये फिरण्यासाठी भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर एका वर्षासाठी मुभा असते. यामुळे तिथे आपण एक वर्षापर्यंत गाडी चालवू शकतो. परंतु अमेरिकेत परवाना हा इंग्रजीत असणे गरजेचे आहे
. यासोबत न्यूझीलंडमध्येही भारतीयांना ड्रायव्हिंग लायसन्सवर एका वर्षासाठी मुभा असते. ऑस्ट्रेलियात वाहन चालवणे हे भारतासारखेच आहे. तुम्ही तुमचे भारतीय लायसन वापरून साउथ वेल्स,
क्वीन्सलँड, कोस्टल ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरीमधील रस्त्यांवर वाहन चालवू शकता. त्या ठिकाणी ३ महिन्यापर्यंत हे लायसन्स वापरता येते. तसेच भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वापरून आपण साउथ वेल्स,
इंग्लंड, स्कॉटलंड , जर्मनी, सिंगापूर , युरोप अशा अनेक देशांमध्ये वाहने चालवू शकतो. फक्त यासाठी त्या देशातील सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम