Dry Fruits Price : थंडीमुळे सुकामेव्याच्या दरात वाढ ; मागणी वाढली

Dry Fruits Price

Dry Fruits Price : थंडीच्या दिवसात शरिरासाठी उपयुक्त असणाऱ्या ड्रायफ्रुटची मागणी गत महिनाभरापासून वाढली असून, काजू, बदाम, आक्रोडची मागणी १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे.

काजूची आवक केरळमधून तर बदामाची आवक अमेरिकेतील कॉलिफोर्नियातून होत आहे तसेच इराणमधूनही बदमाची आवक होते. काजूच्या नवीन हंगामाची सुरुवात झाली असून, त्याला मागणीही चांगली आहे तसेच अक्रोडची आवक दक्षिण अमेरिकेतील चिलीतून होत असून, अक्रोडची प्रत वारीही उत्तम आहे.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत ड्रायफ्रूटला चांगली मागणी असते. हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारावरही लक्ष केंद्रीत केले जाते. हिवाळ्यात जीममध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढत असते.

व्यायामासोबत पोषक असा आहार घेण्यासाठी डिंकलाडू, शेंगदाणे आदींपासून तयार केलेल्या लाडूंचे सेवनही केले जाते. हे पदार्थ बनविण्यासाठी ड्रायफ्रुट वापरले जात असल्याने त्यांना चांगली मागणी असते.

गतवर्षी प्रमाणे यंदाही थंडी वाढत आहे. तशी ड्रायफ्रूटच्या मागणीतही वाढ होत आहे. हिवाळा ऋतुतील हवामान पचनशक्तीसाठी पुरक असल्याने अनेक नागरिक आरोग्यासाठी ड्रायफ्रूटचे सेवन करतात.

यात काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, खारीक, खजूर, मनुका, असे अनेक पदार्थ असतात. गत महिनाभरात ड्रायफ्रूट व पौष्टिक घटक असलेल्या वस्तूंच्या मागणीत दुपटीने वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

थंडीच्या दिवसात पौष्टिक पदार्थ खावेत, असा सल्ला डॉक्टरही देत असतात. महिनाभरापासून बाजारपेठेत काजू, किसमीस, खजुर, खारीक, खोबरे, मनुका यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe