अमेरिकेच्या सफरचंदांची भारतीयांना भुरळ, निर्यातीमध्ये १६ पट वाढ

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीयांना अमेरिकेच्या सफरचंदांची भुरळ पडली आहे. याचा परिणाम म्हणजे अमेरिकेतून भारतात होणाऱ्या सफरचंदांची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ पटीने वाढली आहे.

भारताने २०१९ मध्ये अमेरिकन उत्पादनांवर आकारण्यात येणारे २० टक्के आयात शुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही निर्यात वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात हे शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला होता.

वॉशिंग्टनमधील सफरचंद उत्पादकांनी यावर्षी सफरचंदांच्या सुमारे १० लाख पेट्या भारतात पाठवल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये १६ पटीने वाढ झाली आहे. या सफरचंद निर्यातीचा आनंदोत्सव अमेरिकेच्या सिएटल बंदरावर साजरा करण्यात आला.

अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंधांमधील हा एक नवा मैलाचा दगड असल्याचे खासदार मारिया कँटवेल यांनी सिएटल येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. सिएटल येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे कौन्सुल जनरल प्रकाश गुप्ता, सेंट्रल वॉशिंग्टनमधील सफरचंद उत्पादक आणि कामगार आणि बंदर अधिकारी या आनंदोत्सवात सहभागी झाले होते.

सफरचंदांवरील आयात शुल्कात २० टक्के वाढ झाल्यानंतर वॉशिंग्टन राज्यातून भारतात होणाऱ्या सफरचंद निर्यातीच्या बाजारपेठेत घसरण झाली होती. शुल्क लागू होण्यापूर्वी वॉशिंग्टनमधील उत्पादकांनी भारतात १२ कोटी डॉलर मूल्याची सफरचंद निर्यात केली होती.

त्यानंतर हे मूल्य १० लाख डॉलरपर्यंत घसरले होते. याचा वॉशिंग्टन राज्यातील सफरचंद उत्पादकांवर मोठा आर्थिक परिणाम झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक अमेरिका दौऱ्यात शुल्क हटवल्यानंतर सफरचंद पिकाच्या हंगामात व्यवसाय पूर्वपदावर आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe