IRCTC Tour Package : सध्या देशामध्ये मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. मान्सूनच्या पावसात अनेकांची पाऊले पर्यटन स्थळांच्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी ओढ घेत असतात. मात्र अनेकदा फिरायला गेल्यानंतर खर्च अधिक येतो.
कधीही आणि कुठेही फिरायला जायचे असेल तर सर्वात प्रथम सर्वजण बजेटचा विचार करत असतात. सर्वांनाच कमी बजेटमध्ये चांगल्या पर्यटन स्थळाला भेट देईची असते. जर तुम्ही दक्षिण भारतात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

कारण आता दक्षिण फिरायला जाण्यासाठी IRCTC कडून स्वस्त टूर पॅकेज सादर करण्यात आले आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना अनेक प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जात असतात. दक्षिण भारत फिरायचे असेल तर तुम्ही IRCTC चे टूर पॅकेज घेऊन फिरायला जाऊ शकता.
IRCTC च्या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना वाहतूक, निवास, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण अशा सुविधा दिल्या जातात. IRCTC कडून प्रवाशांना भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे दक्षिण भारताची सैर केली जाणार आहे. ‘दिव्य दक्षिण यात्रा’ असे या यात्रेचे नाव ठेवण्यात आले आहे.
IRCTC कडून सादर करण्यात आलेल्या दक्षिण भारत यात्रेसाठी 9 दिवस आणि 8 रात्रीचे टूर पॅकेज देण्यात आले आहे. जर तुम्हालाही दक्षिण भारत यात्रा स्वस्तात करायची असेल तर तुम्ही IRCTC च्या या टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
दक्षिण भारत यात्रेसाठी तुम्हाला आगोदरच टूर पॅकेज बुक करावे लागेल. तसेच ही टूर 9 ऑगस्ट 2023 रोजी सुरू होणार असून 18 ऑगस्ट रोजी संपणार आहे. तेलंगणातील सिकंदराबाद येथून या यात्रेस सुरुवात होणार आहे. यामध्ये कन्याकुमारी, मदुराई, अरुणाचल, रामेश्वरम, त्रिवेंद्रम आणि त्रिची अशी ठिकाणी भेट दिली जाणार आहे.
या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना रामेश्वरममधील रामनाथस्वामी मंदिर, तिरुवन्नमलाई येथील अरुणाचलम मंदिर, कन्याकुमारीमधील टुरिस्ट रॉक मेमोरियल यासह अनेक मंदिरांना भेट देता येणार आहे. त्यामुळे प्रवाशी दक्षिण भारतातील प्रमुख ठिकणांना भेट देऊन आनंद घेऊ शकतात.
जर तुम्हालाही दक्षिण भारत फिरण्यासाठी IRCTC चे टूर पॅकेज बुकिंग करायचे असेल तर तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तसेच आगोदरच तुम्हाला त्याचे तिकीट बुक करावे लागेल. यासाठी तुम्ही https://www.irctctourism.com/ या वेबसाइट ला भेट देऊन तिकीट बुकिंग करू शकता.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दक्षिण भारत फिरण्यासाठी IRCTC चे टूर पॅकेज किट रुपयांना उपलब्ध आहे. हे टूर पॅकेज वेगवेगळ्या श्रेणीनुसार त्यांच्या किमती देखील वेगवेगळ्या आहेत. इकॉनॉमी क्लासमध्ये प्रति तिकिटाचे भाडे 14,300 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
तसेच जर तुम्हाला इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करायचा नसेल तर तुम्ही 21,900 रुपयांचे स्टॅंडर्ड क्लासमध्ये तिकीट बुक करून प्रवास करू शकता. तसेच तुम्हाला आणखी सोयी सुविधा हव्या असतील तर तुम्ही २८,५०० रुपयांचे कंफर्ट क्लासचे तिकीट बुक करून दक्षिण भारत फिरण्याचा आनंद घेऊ शकता.