Health Tips : भारतातील प्रत्येक घामध्ये जेवणाला गव्हाच्या पीठाने बनलेली चपाती मिळते. भारतीय घरांमधील जेवण चपातीशिवाय अपूर्ण आहे. भारतीय जेवणाच्या ताटात काही गोष्टींचा नेहमीच समावेश असतो, भात, चपाती, भाज्या आणि डाळी. त्यांच्याशिवाय जेवणाची थाळी अपूर्ण दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का? प्रत्येक गोष्ट खाण्याची एक योग्य वेळ असते. जर तुम्ही कोणाला विचारले की तुम्ही दिवसातून गव्हाच्या पीठाने बनलेली चपाती किती वेळा खाता? तर सहसा त्यांचे उत्तर दोन्ही वेळेस असे येईल.
पण तुम्हाला माहीत आहे का की, चपाती खाण्याचीही एक योग्य वेळ असते. खरे तर, चपातीमध्ये भरपूर कॅलरीज आणि कार्ब्स असतात. रात्रीच्या वेळी याचे सेवन केल्यास ते पचायला खूप वेळ लागतो. यासोबतच साखरेची पातळी वाढण्याचा धोकाही वाढू शकतो. म्हणूनच रात्रीच्या जेवणात चपाती खाणे आरोग्यासाठी नुकसानाकरक आहे. मग चपाती कोणत्या वेळी खावी? आणि जेवणात चपातीचा किती समावेश करावा? याबद्दल आज आम्ही माहिती घेऊन आलो आहोत चला तर मग…

रात्रीच्या वेळी गव्हाच्या पीठाने बनलेली चपाती खाणे योग्य की अयोग्य?
गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपातीमध्ये 71 कॅलरीज असतात. जर तुम्ही रात्री 2 चपात्या खाल्ल्या तर तुमच्या शरीराला त्यातून 142 कॅलरीज मिळतात. रात्रीच्या वेळी याचे सेवन केल्याने तुमचे वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही तुमचे वजन कमी करता असाल तर रात्रीच्या वेळी चपाती खाणे शक्यतो टाळा.
चपाती किती खायची?
जर तुम्ही गव्हाच्या पीठाने बनलेली चपाती खात असाल तर २ पेक्षा जास्त खाऊ नये. यासोबत जेवल्यानंतर चाला. रात्रीचे जेवण लवकर करा जेणेकरून त्यांना पचायला योग्य वेळ मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फक्त 1 चपाती खाऊ शकता आणि त्यासोबत जास्त प्रमाणात कोशिंबीर आणि कोणतीही डाळ ठेवू शकता.
गॅसवर चपाती भाजण्याचे तोटे
बहुतेक जर वेळ वाचवण्यासाठी गॅसवर चपट भाजतात. पण असे करणे हानिकारक ठरू शकते. गॅसवर चपाती भाजल्याने त्याच्या आत भरलेली हवा आरोग्यास हानी पोहोचवू शकते. म्हणूनच कधीही गॅसवर चपाती भाजू नये, तुम्ही ती तव्यावर भाजू शकता.