Anjeer Benefits : अंजीरचा प्रभाव उष्ण असल्यामुळे अनेकांना ते उन्हाळयात खाण्याची भीती वाटते. अशास्थितीत लोक उन्हाळ्यात ते खाणे शक्यतो टाळतात. पण शरीराच्या अनेक आजारांवर ते फायदेशीर खूप आहे. यामध्ये असलेले अनेक पोषक तत्व आजारांशी लढण्यास मदत करतात.
अंजीरमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन (बी6, के), पोटॅशियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. म्हणूनच अंजीरचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते, पण जर तुम्ही हे उन्हळ्यात खाणे टाळत असाल तर आम्ही अशा काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही उन्हाळ्यातही अंजीरचे सेवन करू शकता.
-जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल तर अंजीर दुधात मिसळून सेवन करा, कारण अंजीर दुधात मिसळल्याने अंजीर थंडावा देणारा प्रभाव पाडतो. तसेच अंजीर दुधात मिसळल्यास ते अधिक पौष्टिक होते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय अंजीरचे मिल्क कॉम्प्रेस बनवून ते पिऊ शकता.
-उन्हाळ्यात अंजीर खाण्यासाठी तुम्ही अंजीर स्मूदी बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम स्मूदीमध्ये अंजीराचे २-३ तुकडे टाकायचे आहेत. यानंतर 2-3 तास तसेच राहूद्या. नंतर स्मूदीमध्ये ते चांगले मिसळा. असे केल्याने तुम्ही उन्हाळ्यातही अंजीर खाऊन तुमचे शरीर निरोगी ठेवू शकता.
-याशिवाय अंजीर पाण्यात मिसळून खाऊ शकता. यासाठी ४-५ अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामुळे पोटाशी संबंधित आजारांपासून आराम मिळेल.