Credit Card हे UPI सोबत लिंक करणे योग्य आहे का? जाणून घ्या 4 फायदे

Published on -

UPI Link Credit Card use and Benefits : आजच्या काळात जास्तीत जास्त लोक डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत, ही प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी यूपीआयचा वापर केला जातो. यूपीआयमुळे गुगल पे, फोनपे, पेटीएम सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्यवहार करणे सोपे झाले आहे.

पूर्वी यूपीआय फक्त डेबिट कार्ड किंवा बँक खात्याशी जोडले जात होते, आता ते क्रेडिट कार्डशीही जोडले जाऊ शकते. होय, UPI हे क्रेडिट कार्डशी देखील लिंक केले जाऊ शकते. असे केल्यास खरेदी करण्यापासून ते कोणताही ईएमआय भरणे किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणे तुमच्यासाठी सोपे असू शकते. पण UPI हे क्रेडिट कार्डशी लिंक करणे योग्य ठरेल का? त्याचे काय फायदे मिळू शकतात? जाणून घ्या..

* क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक करणे योग्य आहे का?

क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता, पण अधिक फायदे मिळवण्याच्या प्रक्रियेत स्वत:चे नुकसान करू नका. कॅशबॅक किंवा इतर ऑफरच्या शोधात असलेले बरेच यूजर्स हे विसरतात की क्रेडिट कार्ड हा एक प्रकारचे डिजिटल लोन आहे जे नंतर परत करणे आवश्यक असतेच.

खूप निष्काळजीपणा देखील तुम्हाला कर्जदार बनवू शकतो. जर तुम्ही क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेवर केले नाही तर तुमच्याकडून व्याज आकारले जाऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष रकमेसोबतच अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.

* UPI सोबत Credit Card लिंक करण्याचे 4 फायदे

1. इन्स्टंट ट्रान्झॅक्शन- क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक केल्याने तुम्ही झटपट पेमेंट करू शकाल. एकदा तुम्हाला तुमच्या डिजिटल पेमेंट अॅपवर जाऊन क्रेडिट कार्ड अॅड करून यूपीआयशी लिंक करावं लागलं. त्यानंतर तुम्हाला कोणालाही पैसे देणं सोपं जाईल.

2. ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा : क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक करून तुम्ही सहज व्यवहार करू शकता. अशा तऱ्हेने ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने पेमेंट करणे तुम्हाला सोपे जाणार आहे.

3. कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉईंट्स : अशा अनेक बँका आणि क्रेडिट कार्ड प्रोव्हायडर आहेत जे आपल्या ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट करताना कॅशबॅकसह रिवॉर्ड पॉईंट्सचा फायदा देतात. आपले क्रेडिट कार्ड यूपीईशी लिंक केल्यास तुम्हाला या ऑफरचा लाभ घेणे सोपे जाऊ शकते.

4. सुरक्षित व्यवहार – सिक्योरिटी फीचर्ससह तुम्ही हे क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक करू शकता. या पद्धतीने क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक केल्यास ट्रॅन्जेक्शनची सिक्युरिटी वाढते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe