Science News : परग्रहावर वस्ती करण्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे प्राणवायू. मानवाची संभाव्य वस्ती होऊ शकते असा ग्रह म्हणजे मंगळ. आता या ग्रहावरच खगोलतज्ज्ञांचे निरनिराळे प्रयोग सुरू आहेत.
त्यातलाच एक प्रयोग म्हणजे मंगळावर ऑक्सिजन तयार करण्याचा. नासाचा हा प्रयोग पुरेपूर यशस्वी झाला आहे. नासाने आतापर्यंत म्हणजेच फेब्रुवारी २०२१ पासून मंगळ ग्रहावर १६ वेळा ऑक्सिजन तयार केला आहे.
नासाने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या विविध यानांसोबत काही चमत्कारिक उपकरणेही पाठवली. त्यात मॉक्सी या उपकरणाचाही समावेश आहे. या उपकरणाच्या माध्यमातून मंगळ ग्रहावर आतापर्यंत १२२ ग्रॅम ऑक्सिजन तयार केला. ऑक्सिजनच्या एवढ्या शिदोरीवर अंतराळवीर मंगळ ग्रहावर तीन तास ४० मिनिटे तग धरू शकतो.
मंगळ ग्रहावरील वातावरणाच्या पातळ आवरणातून कार्बनच्या एका अणूपासून ऑक्सिजनचा एक अणू काढण्याची ही पद्धत मॉक्सीने करून दाखवली. मॉक्सीने तयार केलेला ऑक्सिजन १०० टक्के शरीराला पोषक नसला तरी तो मानवाला मंगळ ग्रहावर उपयुक्त ठरू शकतो.
म्हणजेच त्याची शुद्धता ही ९८ टक्के एवढी असल्याचे नासाच्या तज्ज्ञांनी सांगितले. मॉक्सीने एका तासात १२ ग्रॅम ऑक्सिजन तयार केला. मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातल्या तंत्रज्ञान विभागाने मॉक्सीची रचना केली.