JIO Recharge Plan : देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Jio) आपल्या यूजर्ससाठी सातत्याने आकर्षक रिचार्ज प्लॅन्स सादर करत आहे. स्वस्त किंमतीतील प्लॅन्सपासून प्रीमियम सेगमेंटपर्यंत जिओच्या पोर्टफोलिओमध्ये विविध पर्याय उपलब्ध असून, कॉलिंग, डेटा, मेसेजिंगसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे फायदे देणारे प्लॅन्स यूजर्समध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहेत.
ओटीटी कंटेंटचा वाढता ट्रेंड लक्षात घेता जिओने काही खास रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत, ज्यामध्ये कमी किमतीतही प्रीमियम ओटीटी अॅक्सेस दिला जातो.

जिओचा सर्वात स्वस्त ओटीटी फायदे देणारा प्लॅन ₹175 किमतीत उपलब्ध आहे. हा एक अॅड-ऑन पॅक असून याची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये 10GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. विशेष म्हणजे, जिओटीव्ही अॅपद्वारे तब्बल 10 ते 12 प्रीमियम ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस मिळतो.
यामध्ये Sony LIV, ZEE5, JioTV, Lionsgate Play, Discovery+, SunNXT, Kanccha Lannka, Planet Marathi, Chaupal आणि Hoichoi यांचा समावेश आहे. मात्र, या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी यूजर्सकडे आधीच अनलिमिटेड कॉलिंग असलेला बेस प्लॅन अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे.
याशिवाय, जिओचा ₹445 चा प्रीपेड रिचार्ज प्लॅन देखील यूजर्ससाठी फायदेशीर ठरत आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा दिली जाते.
तसेच, जिओटीव्हीद्वारे 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा मोफत अॅक्सेस आणि अनलिमिटेड 5G डेटा यामध्ये समाविष्ट आहे. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये 18 महिन्यांसाठी Google Gemini Pro प्लॅनचाही लाभ मिळतो.
प्रीमियम यूजर्ससाठी जिओचा ₹500 चा रिचार्ज प्लॅन एक परिपूर्ण पर्याय आहे. 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, रोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस दिले जातात.
यासोबतच YouTube Premium, Jio Hotstar, Prime Video Mobile Editionसह अनेक लोकप्रिय ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस मिळतो. शिवाय, Jio Cloud अॅक्सेस आणि Jio Home चा दोन महिन्यांचा मोफत ट्रायल देखील या प्लॅनमध्ये दिला जातो.
एकूणच, डेटा आणि ओटीटी एंटरटेनमेंटचा भरपूर फायदा घ्यायचा असेल, तर जिओचे हे रिचार्ज प्लॅन्स यूजर्ससाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत.













