Jyotish Tips : ज्योतिष शास्त्रात कार्तिक महिना खूप पवित्र मानलाजातो. अनेकजण या महिन्यात भगवान विष्णूची पूजा करतात. इतकेच नाही तर कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करण्याचीही विशेष परंपरा देखील आहे. परंतु तुम्ही काही चुका टाळणे देखील खूप गरजेचे आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे की जरी शास्त्रानुसार तुळशीचे रोप कोणत्याही गुरुवारी लावता येत असले तरी या कामासाठी कार्तिक महिना खूप शुभ मानला जातो. कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करून तुळशीविवाह केला तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे धार्मिक शास्त्रातील जाणकारांचे मत आहे.
मान्यतेनुसार कार्तिक महिन्यात घराच्या अंगणामध्ये तुळशीचे रोप लावावे. इतकेच नाही तर हे बेडरूमशी संलग्न बाल्कनीमध्ये देखील स्थापित करता येते. कार्तिक महिन्यात दररोज तुळशीला पाणी देऊन प्रदक्षिणा करणे गरजेचे आहे. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
त्याशिवाय कार्तिक महिन्यात नियमितपणे संध्याकाळी तुळशीखाली तुपाचा दिवा लावणे महत्त्वाचे आहे. तसेच तुळशीची पूजा कार्तिक महिन्यात ब्रह्म मुहूर्तावरच करावी, हे लक्षात ठेवा. समजा कार्तिक महिन्यात मंगळवारी तुळशीला जल अर्पण केल्याने धनाची प्राप्ती देखील होते.
घ्या ही काळजी
धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक महिन्यामध्ये सकाळच्या वेळी तुळशीची पाने तोडली पाहिजेत. इतर वेळी तुळशीची पाने तोडणे शुभ मानले जात नाही. कार्तिक महिन्यातील रविवारी तुळशीखाली दिवा लावू नये. कार्तिक महिन्यात भगवान विष्णूची पूजा करत असताना तुळशीची पाने भगवान विष्णूला अर्पण करावी. तसेच गणेश आणि माता दुर्गा यांना चुकूनही तुळशीची पाने अर्पण करू नये. परंतु हे लक्षात ठेवा तुळशीची पाने कधीच शिळी होत नाहीत. आता तुम्ही पूजेमध्ये जुनी पाने वापरू शकता.