Jyotish Tips : जोतिषशास्त्रानुसार सर्व नऊ ग्रह आपली राशी सतत बदलत राहत असतात. या दरम्यान, ते बरेच शुभ आणि अशुभ योग तयार करत असतात, ज्याचा प्रभाव विविध राशींवर होत असतो. अशातच आता ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणाऱ्या बुधाच्या संक्रमणाने ‘भद्र राजयोग’ तयार होत आहे.
याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. परंतु अशा 4 राशी आहेत, ज्यांना याचा खूप जास्त फायदा होणार आहे आणि त्यांना प्रगती आणि संपत्ती मिळणार आहे. त्यांना कशाचीच कमतरता भासणार नाही. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर.
कन्या रास
ऑक्टोबर महिन्यामध्ये बुध कन्या या राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत बुधाच्या संक्रमणाने तयार होणारा भद्र राजयोग या राशीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. खरे तर या काळात नोकरी आणि व्यवसायाशी निगडित सर्व अडचणी दूर होऊ शकतील. तसेच या दरम्यान व्यवसायात खूप मोठा आर्थिक लाभ होणार आहे.
मिथुन रास
मिथुन रास असणाऱ्या लोकांसाठी बुध ग्रहाच्या संक्रमणाने तयार होणारा भद्र राजयोग वरदानच ठरेल. कारण या दरम्यान नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांची खूप प्रगती होईल. इतकेच नाही तर त्यांना जमिनीच्या कामातून भरपूर धनलाभ होईल. त्यांचा मानसिक त्रासही या काळात दूर राहील. हे लक्षात घ्या की आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ या दरम्यान मिळेल.
मीन रास
मीन रास असणाऱ्या लोकांसाठी बुध ग्रहाचा भद्र राजयोग अतिशय शुभ आणि फलदायी मानला जात आहे. खरे तर या दरम्यान व्यवसाय आणि नोकरीत मिन राशीच्या लोकांना प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तुम्हाला या दरम्यान मोठा भाऊ किंवा पालकांकडून आर्थिक मदत मिळू शकते. हा काळ व्यवसायासाठी खूप फायदेशीर असणार आहे. व्यवसायातून प्रचंड आर्थिक लाभ होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल.
सिंह रास
सिंह राशीसाठी भद्र राजयोग वरदान ठरेल. दिवाळीपूर्वी या राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळणार आहे. तसेच परदेश प्रवासामुळे अनेक स्त्रोतांकडून धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. इतकेच नाही तर या दरम्यान त्यांच्या काही मोठ्या योजना साकार होतील. त्यांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. व्यवसायात मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल. नोकरीच्या शोधात लोकांच्या अडचणी दूर होऊन तसेच इतरांना दिलेले कर्जाचे पैसे तुम्हाला परत मिळतील.