Jyotish Tips : ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण १२ राशी आणि ९ ग्रहांचा अभ्यास करण्यात येतो. सर्व ९ ग्रहांमध्ये शनि हा ग्रह खूप महत्वाचा मानला जातो. कारण शनिदेव माणसाला त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ९ ग्रहांमध्ये शनि खूप मंद गतीने चालतात.
त्यामुळेच त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एकूण अडीच वर्षांचा कालावधी लागतो. ज्यावेळी शनि राशी बदलत असतात त्यावेळी त्याचा सर्व राशींवर परिणाम होत असतो. अशातच लवकरच शनिदेवाचे संक्रमण होणार आहे. ज्याचा फायदा काही राशींना होणार आहे.

वृषभ रास
वृषभ या राशीसाठी शनीचे संक्रमण फायद्याचे राहील. नोव्हेंबर महिन्यामध्ये शनीचे संक्रमण सुख-समृद्धी घेऊन येणार आहे. तसेच त्यांच्या व्यवसायात आर्थिक सुधारणा दिसून येणार आहे. या काळात वृषभ राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो. शिवाय त्यांना आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या कुटुंबात आशीर्वाद राहील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना शनिदेवाच्या कृपेने चांगली बातमी मिळू शकेल.
मेष रास
या राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना वरदानापेक्षा कमी नसेल. ज्यावेळी या महिन्यात शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करतील त्यावेळी या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत. या वेळी त्यांना शनिदेव तसेच देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद त्यांना मिळणार आहे. तसेच या काळात त्यांना धनलाभ होईल. व्यवसायात आर्थिक घडामोडी वाढायला लागतील. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. रखडलेले पैसे देखील मिळतील.
मिथुन रास
ज्यावेळी नोव्हेंबर महिन्यात शनिदेव आपली राशी बदलतात त्यावेळी मिथुन राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे. तसेच या काळात त्यांना भरपूर पैसे मिळतील. व्यवसायात चालू असणारी आर्थिक संकटे दूर होतील. तर तुमचा रखडलेला पैसे परत मिळेल. इतकेच नाही तर तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीत उत्तुंग यश मिळेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात आर्थिक उन्नती होईल.
धनु रास
या राशीसाठी शनीचे संक्रमण शुभ मानले जाते. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक लाभामुळे या राशीच्या लोकांचे जीवन आनंदी या दरम्यान राहू शकते. कुटुंबातील सदस्यांची आर्थिक प्रगती देखील या काळात होईल. त्यांना करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. शनिदेव आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल.
कन्या रास
संक्रमणामुळे कन्या रास असणाऱ्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना यश मिळेल. नोकरीत नवीन संस्थेकडून चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात धन आणि लाभ होईल. नवीन योजना साकार होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक लाभ वाढण्याची शक्यता आहे. शनिदेव आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने कुटुंबाची आर्थिक स्थिती या काळात सुधारू शकते.
कर्क रास
कर्क रास असणाऱ्या लोकांची नोव्हेंबर महिन्यात खूप प्रगती होणार आहे. या दरम्यान आर्थिक क्षेत्रातील संपत्तीत वाढ होऊ शकतो. तसेच या काळात आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होऊ शकते. व्यवसायात विशेष आर्थिक लाभ होऊ शकतो.