Ketu Gochar : ‘या’ 4 राशींवर असेल राहू-केतूचा आशीर्वाद, नशिबाची मिळेल साथ !

Content Team
Published:
Ketu Gochar

Ketu Gochar : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना आणि कुंडली विशेष महत्व आहे. प्रत्येक ग्रह हा एका राशीशी संबंधित आहे. म्हणूनच जेव्हा ग्रहांमध्ये हालचाल होते तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. ग्रह एका विशिष्ट वेळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा विविध राशींवर चांगला आणि वाईट असा परिणाम दिसून येतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात ग्रहांना खूप महत्व आहे.

त्याचवेळी राहू आणि केतू हे ज्योतिषशास्त्रात मायावी ग्रह म्हणून ओळखले जातात. त्यांचे राशी परिवर्तन खूप महत्वाचे मानले जाते. अशातच सध्या राहु मीन राशीत तर केतू तूळ राशीत असून १८ मे २०२५ पर्यंत त्याच राशीत भ्रमण करतील. या काळात त्यांचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल, परंतु या 4 राशीच्या लोकांवर राहूसह देवी लक्ष्मीची विशेष कृपा असेल. कोणत्या आहेत या भाग्यवान राशी चला पाहूया…

वृषभ

राहू मीन राशीत असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. व्यापार्‍यांसाठी हा काळ खूप उत्तम मानला जात आहे. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. मुलांच्या चांगल्या कृत्यांमुळे समाजात पालकांचा गौरव होईल. त्यामुळे त्यांचा आदर वाढेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा राशी बदल खूप फलदायी मानला जात आहे. या काळात नोकरीत प्रमोशन मिळेल, तसेच परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. ज्यमुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईल. त्याचबरोबर अचानक धनलाभ होऊन आर्थिक लाभ होईल. मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तथापि, या काळात आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्याच वेळी, देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्या कुटुंबावर वर्षाव करेल. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल.

कर्क

राहूचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभाची संधी देईल. या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्हाला कार, बंगला, घर, जमीन खरेदी करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. ऑफिसमधील बॉस तुमच्या कामावर खूश असतील आणि तुम्हाला प्रमोशनही मिळू शकते. एकूणच हा काळ तुमच्या बाजूने असेल.

कुंभ

कुंभ राशीसाठी हा काळ खूप फायदेशीर मानला जात आहे. या काळात वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. पण नंतर सगळ्या गोष्टी मार्ग लागतील. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला मोठा फायदा होईल. या काळात तब्येत सुधारेल. दीर्घकाळ चाललेली कायदेशीर लढाई संपेल. त्यामुळे मन समाधानी असेल, या काळात मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe