अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- अभिनेते किरण माने यांनी भाजप सरकारविरोधात सोशल मीडियावर राजकीय आशयाची पोस्ट टाकल्याने ते वादाच्या भोवऱ्यात चांगलेच सापडलेले दिसत आहे. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मराठी मालिकेतून काढून टाकण्यात आल्याने, राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज ठाकरे यांच्या मनसेने माने यांच्या विरोधात भूमिका घेतली असून, मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात खोपकर बोलताना म्हणाले कि, मला या प्रकरणावर काही बोलायचे नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला.
योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर काढले गेले. यावर ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भूमिका मांडेल, असे खोपकर म्हणाले आहे तसेच पुढे आज किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, “आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू.” आज मीडियावाले सेटवर जाणार आहेत.
अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे. करुद्या आरोप ,जाऊद्या झाडून, ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्रॉडक्शन हाऊसविरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे.
चारेक संघविचारी खरोखर माझ्याविरोधात आहेत. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच!” “पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर विश्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगण घालनारे आणि लाळघोटे कलाकार ढीग आहेत.
त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुम्ही ठरवा! मी बी कंबर कसलेली हाय. कच्च्या गुरूचा चेला नाय मी! तुका म्हणे रणी… नये पाहो परतोनी!”
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम