Kitchen Tips: कांदा महाग झाल्याचं नका घेऊ टेन्शन! या टिप्स वापरा आणि वर्षभर घरी कांदा टिकवा

kitchen tips

Kitchen Tips:- कांदा हे प्रत्येक घरात आवश्यक आणि दररोज वापरला जाणारा पदार्थ असून प्रत्येक भाजीमध्ये बहुतांशी कांदा वापरला जातो. परंतु कांद्याचे वैशिष्ट्य पाहिले तर याची जास्त दिवस साठवणूक करता येत नाही. कारण कांदा हा नाशवंत असल्याने लवकर खराब होतो.

त्यामुळे अशा परिस्थितीत जर कांद्याचे दरवाढ झाली तर  मात्र कांद्यासाठी जास्त पैसा मोजावा लागतो. जर कांदा दोन ते तीन महिन्यापेक्षा जास्त काळ साठवता आला तर कांद्याचे दरवाढ झाली तरी देखील आपण कमी दरात कांदा खरेदी करून त्याला वर्षभर साठवून ठेवू शकतो.

परंतु अशा काही टिप्स आहेत का हा देखील एक मोठा प्रश्न आपल्याला पडतो. त्यामुळे या लेखात आपण अशा काही पद्धती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जेव्हा कांद्याचे दर कमी असतील तेव्हा वर्षभर पुरेल इतका कांदा खरेदी करून तुम्ही घरात आरामात साठवू शकतात.

 या टिप्स वापरा आणि कांदा वर्षभर साठवा

1- याकरिता तुम्ही सुरुवातीला कांदे सोलून घ्यावेत व त्यानंतर त्यांचे लांब आकाराचे काप करावेत. एका मोठ्या प्लेटमध्ये हे कापलेले कांदे पसरवून घ्यावेत व सुती कापडाने त्यांना झाकून घ्यावे.

सुती कापडाने झाकलेली प्लेट पाच दिवसांपर्यंत उन्हामध्ये ठेवावी. त्यानंतर हे वाळलेले कांदे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यावेत व या कांद्याच्या पावडरचा उपयोग तुम्ही घरामध्ये भाजी बनवताना वर्षभर करू शकता.

 ही पद्धत देखील ठरेल फायद्याची

यामध्ये तुम्ही कांद्याचे भाव कमी असताना जास्त कांदा विकत घेऊन ठेवावा. कांदा घेतल्यानंतर तो वर्षभर साठवून व चांगल्या स्थितीत राहील त्याकरिता सुरुवातीला त्याला सोलून घ्यावा व लांब आकाराचा कांदा कापून घ्या. कांदा कापल्यानंतर हाताने त्यांना क्रश करा व त्यामुळे सर्व कांदे वेगवेगळे होणार.

त्यानंतर एका कढईत कापलेले कांदे टाकावे आणि त्यावर तेल टाका आणि गॅसवर ही कढई ठेवा. कमी आचेवर हा कांदा चांगला शिजवून घ्यावा. या प्रक्रिये दरम्यान कांदा अधून मधून परतवून घ्यावा. ही प्रक्रिया करत असताना कांदा गुलाबी होताना दिसेल. परंतु कांदा परतताना व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे आहे

कांदा जळू नये याची काळजी घ्यावी. जेव्हा कांद्याला सोनेरी रंग येईल तेव्हा कांदा कढईतुन काढावा व एका प्लेटमध्ये ठेवावा. नंतर कांद्यामध्ये असलेले तेल पूर्णपणे काढून घ्यावे.अशाप्रकारे तुम्ही प्रक्रिया केलेला कांदा केव्हाही वापरू शकतात. अशा प्रकारचा कांदा तुम्ही भाजी किंवा पुलाव मध्ये देखील फोडणीसाठी वापरू शकतात.

तसेच एक ते दीड किलो कांदा फ्राय करून तुम्ही त्याची साठवणूक करू शकता व एका डब्यात भरून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात.तसेच महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर कांदा ठेवायचा असेल तर बटाट्यासोबत कधीही ठेवायचा नाही. तसेच कच्च्या कांद्यांना फ्रिजमध्ये देखील ठेवू नका. लसणासोबत कांदा साठवणूक करा. याचा देखील खूप मोठा फायदा होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe