Lipstick Facts : जगभरातील महिलांचा सर्वांत जिव्हाळ्याचा विषय आहे ‘मेकअप’ स्त्रिया मुळातच पुरुषांच्या तुलनेने सुंदर असतात. हे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी अनेकविध सौंदर्य प्रसाधने स्त्रिया वापरत असतात. त्यातील एक महत्त्वाचे सौंदर्यप्रसाधन म्हणजे ओठांना आपल्या वेषभूषेनुसार रंगाची छटा देणारे लिपस्टिक.
या लिपस्टिकमध्येही व्हेज-नॉनव्हेज असा काही फरक असू शकेल याचा विचारही आजवर महिलांच्या मनाला शिवला नसेल. पण तसे असते म्हणे. लिपस्टिकही नॉनव्हेज असू शकते. नव्हे काही लिपस्टिकच्या ब्रँड्सवर तसे लिहिलेदेखील असते.

वास्तविक, लिपस्टिकचे असे अनेक ब्रँड आहेत की ज्यांमध्ये कीटकांपासून मिळणाऱ्या रसायनांचा वापर केला जातो. त्या अर्थी वा लिपस्टिक नॉनव्हेज ठरतात. विशेषतः लाल रंगाची लिपस्टिक नॉनव्हेज असण्याची शक्यता जास्त असते. लाल रंगाची लिपस्टिक अशा कीटकापासून बनवली जाते, ज्यातून चमकदार लाल रंग बाहेर येतो. जेव्हा तुम्ही ते तुमच्या ओठांवर लावता तेव्हा तुमचे ओठ लालचुटूक दिसतात.
लिपस्टिकच्या शेडला कार्माइन म्हणतात. हा रंग लाल रंगाच्या कीटकांपासून बनवला जातो. हे कीटक अमेरिकेत आढळतात. पूर्वीच्या काळी या कीटकांपासून पाण्याचा रंग तयार केला जात असे.
पण आता त्यापासून लिपस्टिक आणि आयशॅडो बनवल्या जातात. तर भगिनींनो, तुम्ही जर शाकाहारी असाल तर लाल रंगाच्या लिपस्टिकपासून दूर राहा, अन्यथा तुमचे उपास-तापास आणि शाकाहारीपण बुडालेच म्हणून समजा.