सिगारेटचा झुरका मारत चहा पिण्याची सवय असेल तर हे नक्की वाचा

Ahmednagarlive24
Published:

वृत्तसंस्था ” चहासोबत तुम्ही काय खाता? यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. ताणतणाव हलका करण्यासाठी अनेकजण व्यसनाच्या आहारी जातात. अशातच अनेकांना सिगारेट झुरका मारत चहा पिण्याची सवय असते.

 

मात्र हीच सवय आरोग्याला त्रासदायक ठरू शकते तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. मात्र चहा आणि सिगारेट एकत्र प्यायल्याने गळा आणि पोट या दोन्ही अवयवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

 

सिगारेटसोबत गरम चहा पिण्याची तुम्हांला सवय असेल तर यामुळे अन्ननलिकेचे नुकसान होऊ शकते. सोबतच या घातक सवयीमुळे अन्ननलिकेचा कॅन्सर बळावण्याची शक्यता पाचपटीने वाढते सिगारेटबरोबर चहा घेतल्याने ‘निकोटिन’ आणि ‘कॅफिन’ दोन धोकादायक पदार्थ एकत्रपणे शरीरात प्रवेश करतात.

 

यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते. गरम चहा हा आपल्या ‘असोफॅगल टिश्यूं’ना प्रभावित करत असतो आणि त्यासोबत धूम्रपान केल्याने ‘अ‍ॅसोफॅगल कॅन्सर’ होण्याचा धोका आणखी वाढतो.

 

संशोधनातून चहामुळे ट्युमरसारखे आजार दूर होतात असे समोर आले. मात्र जर तुम्ही गरम खाद्यपदार्थ आणि पेयांसोबत स्मोकिंग करत असाल तर गळ्याचा इसोफेगस खराब होतो.

 

याआधी झालेल्या अनेक संशोधनातून चहामुळे ट्युमर सारखे आजार दूर होतात असे समोर आले आहे. मात्र जर तुम्ही गरम खाद्यपदार्थ आणि पेयांसोबत स्मोकिंग करत असाल तर गळ्याचा इसोफेगस खराब होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment