Lifestyle News : घरातील झुरळांना वैतागला आहात का? तर मग ‘हे’ उपाय तुमच्या खूप फायद्याचे ठरतील

Ahmednagarlive24 office
Published:

Lifestyle News : घरात (Home) उंदीर, झुरळ, मुंग्या यामुळे किचन (Kitchen) खराब होत असते. तसेच यामुळे रोगराई (Disease) देखील पसरत असते. व आपल्यासाठी हे धोक्याचे (danger) ठरू शकते. त्यामुळे झुरळांपासून (Cockroaches) मुक्ती मिळवण्यासाठी हे सोप्पे प्रभावी घरगुती उपाय एकदा करून पहा.

बेकिंग सोडा-

बेकिंग सोड्यामध्ये थोडी साखर मिसळा आणि जिथे झुरळे जास्त राहतात असे तुम्हाला वाटते त्या ठिकाणी ठेवा. स्वयंपाकघरातून झुरळे साफ करण्यासाठी ही सर्वोत्तम कृती आहे

तमालपत्र-

झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वप्रथम तमालपत्र ठेचून त्याचा चुरा बनवा. आता हे तमालपत्र चुर्ण घरी ठेवा, विशेषत: स्वयंपाकघराच्या त्या कोपऱ्यात जिथे झुरळ जास्त येतात. तमालपत्राच्या वासाने घराच्या कानाकोपऱ्यात लपलेली सर्व झुरळे पळून जातील.

कडुलिंबाचे झाड-

झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे. कडुलिंबाच्या तेलात आणि पावडरमध्ये काही घटक आढळतात जे झुरळे नष्ट करण्यास मदत करतात. जर तुम्हाला कडुलिंबाचे तेल वापरायचे असेल तर त्यात थोडेसे पाणी टाकून स्प्रे बाटलीत टाका आणि झुरळ लपून बसलेल्या ठिकाणी शिंपडा.

पेपरमिंट तेल-

आवश्यक तेलांमध्येही झुरळ मारण्याची क्षमता असते. झुरळे दूर करण्यासाठी पेपरमिंट तेल सर्वात प्रभावी मानले जाते. यासाठी या तेलात मिठाचे पाणी विरघळवून द्रावण तयार करावे लागेल. मग जिथे झुरळे दिसतात तिथे वापरा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe