अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- देशात इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता २६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे. दरम्यान घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
या नव्या दरांमुळे व्यावसायिक वापराचा १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १७३६.५ रुपयांवरुन २०००.५ रुपये इतकी झाली आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांची दरवाढ झालेली नाही.
दरम्यान, या वाढीनंतर आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर २००० रुपयांच्या पुढे गेला आहे. पूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १७८३ रुपयांना मिळणारा १९ किलोचा सिलेंडर आता १९५० रुपयांना मिळणार आहे.
त्याच वेळी, आता कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलेंडर २०७३.५० रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये आता १९ किलोच्या सिलेंडरची किंमत २१३३ रुपये आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम