Mahashivratri News 2024 : देशात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जात असते. लाखो-करोडो भाविक या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करत असतात. 2024 मधील महाशिवरात्री 8 मार्च रोजी होणार आहे.
महाशिवरात्री दिवशी तयार होणार योग अतिशय शुभ मानले जातात. त्यामुळे हा दिवस अनेकांसाठी खूप फायदेशीर ठरत असतो. महाशिवरात्रीचे व्रत पाळणाऱ्या व्यक्तींना देखील चांगला लाभ मिळत असतो.

महाशिवरात्री दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. 8 मार्च 2024 रोजी असलेल्या महाराशिवरात्री दिवशी देखील अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी अनेकजण शिवलिंगावर भांग, बेलपत्र, शमीपत्र, गंगाजल आणि दूध-दही अर्पण करत असतात.
शुभ वेळ
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला म्हणजेच 8 मार्च 2024 रोजी रात्री 9.57 मिनिटांनी महाशिवरात्री उत्सव सुरू होणार आहे.
दुसऱ्या दिवशी 09 मार्च रोजी संध्याकाळी 06:17 वाजता महाशिवरात्री संपणार आहे.
तुम्हालाही पूजा करायची असेल तर 06:25 ते 09:28 हा शुभ वेळ आहे.
हे योगायोग घडत असतात
8 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी चतुर्ग्रह संयोग होत आहे. शनि कुंभ राशीमध्ये मूळ त्रिकोणात स्थित असणारा आहे.
तुम्ही यावेळी व्रत केले तर अधिक शुभ मानले जाते.
यावेळी महाशिवरात्री आणि शुक्र प्रदोष व्रत एकाच दिवशी येत असल्याने हे व्रत अधिक शुभ असेल.
महाशिवरात्री दिवशी भगवान शंकराची पूजा करा.
महाशिवरात्री दिवशी तुम्हालाही पूजा करायची असेल तर तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊन करू शकता. स्नान, अभिषेक, धूप, दिवा, नैवेद्य, चंदन, बेलपत्र, फळे, फुले इत्यादींनी तुम्ही शंकराच्या मूर्तीची पूजा करू शकता. महाराशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास ठेऊन संध्याकाळच्या वेळी भगवान शंकराची पूजा करा.