Mangal Gochar : ग्रहांच्या माणसाच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. तेव्हा त्याचा परिणाम इतर १२ राशींवर दिसून येतो. कधी परिणाम शुभ दिसून येतो तर कधी अशुभ. म्हणूनच ग्रहांना मानवी जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे.
अशातच शारीरिक ऊर्जा, सामर्थ्य, आत्मविश्वास, धैर्य इत्यादींचा कारक मंगळ 16 नोव्हेंबर रोजी आपली राशी बदलणार आहे. मंगळ गुरुवारी सकाळी 10:04 वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या या बदलांमुळे सर्व राशींवर परिणाम दिसून येईल. काहींना फायदा तर काहींना तोटा होईल. तीन राशी आहेत ज्यांना सावध राहण्याची गरज आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया.

धनु
धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण चांगले मानले जात नाही. या काळात आरोग्य बिघडू शकते, तसेच आर्थिक खर्च देखील वाढेल. कोर्ट केसेसमुळे त्रास होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आत्मविश्वास कमी होईल. या काळात खचून न जात खंभीर राहण्याची गरज आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांवरही मंगळाचा अशुभ परिणाम दिसून येणार आहे. या काळात तब्येत बिघडू शकते. तसेच वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. खर्चात वाढ झाल्याने आर्थिक संकट येऊ शकते. त्यामुळे तणाव वाढेल. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
मेष
मेष राशीच्या लोकांच्या जीवनात संघर्ष वाढेल. जवळच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. भावा-बहिणीशी वाद होऊ शकतो. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गोष्टी अजून बिघडू शकतात. आत्मविश्वास आणि धैर्य कमी होऊ शकते. या काळात जास्त सावध राहण्याची गरज.
कन्या
कन्या राशीच्या तिसऱ्या घरात मंगळाचे भ्रमण होईल. ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास कमी होईल. रागामुळे केलेले कामही बिघडू शकते. मानसिक तणाव वाढू शकतो. या काळात खर्च वाढेल. एकूणच येणार काळ अशुभ आहे सावध राहण्याची जास्त गरज आहे.