Mars Transit In Scorpio 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला खूप म्हत्वाचे स्थान आहे. मंगळ ग्रह हा भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मानला जातो. अशातच 3 ऑक्टोबर रोजी मंगळाने आपल्या मित्र शुक्राच्या राशीत प्रवेश केला, जो 15 नोव्हेंबरपर्यंत राहील. यानंतर, 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल, जे तीन राशींसाठी खूप फायदेशीर मानले जात आहे .
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा म्हणून ओळखला जाणारा सूर्य आत्मा आणि पिता यांचा कारक मानला जातो. अशातच सूर्य देखील 17 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत सूर्य आणि मंगळाचा संयोग होईल. जो काही राशींसाठी खूप फायदेशीर मानला जातो.
मंगळाचे संक्रमण ‘या’ राशींसाठी भाग्यवान ठरेल !
मीन
मंगळाचे संक्रमण या राशींसाठी खूप शुभ मानले जाते. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. यावेळी देश-विदेशात प्रवास होऊ शकतो. ज्याचा भविष्यात फायदा होतो. या काळात जमीन आणि मालमत्ता खरेदीचा योग आहे. या काळात करिअर आणि व्यवसायासाठी काळ उत्तम राहील, या काळात नवीन संधी देखील मिळू शकते आणि आर्थिक लाभ मिळू शकेल. ठप्प झालेल्या कामांना गती मिळेल.
तूळ
मंगळाचे भ्रमण लाभदायक ठरू शकते. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. धैर्य आणि शौर्य वाढेल. भागीदारीचे फायदे मिळू शकतात. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध सौहार्दाचे राहतील. सध्या मंगळ आणि रवि तूळ राशीत आहेत, त्याच्या प्रभावाखाली मालमत्तेची किंवा वाहनाची खरेदी-विक्री होण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तसेच आर्थिक लाभाचीही दाट शक्यता आहे.
सिंह
वृश्चिक राशीतील मंगळाचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जात आहे. या काळात मालमत्ता खरेदी करता येईल. जमीन व मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल आणि पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. सध्या शुक्राच्या राशीत मंगळ आणि सूर्याचा योग आहे. त्यामुळे वाहन व मालमत्ता खरेदीची शक्यता आहे.