Mercury Transit 2023 : 6 नोव्हेंबरपर्यंतचा काळ ‘या’ राशींसाठी लाभदायक; करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत !

Mercury Transit 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना महत्वाचे स्थान आहे, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, यावेळी त्याचा मानवी जीवनात खोलवर परिणाम दिसून येतो, तसेच ग्रहांच्या या राशी बदलामुळे काही विशिष्ट राजयोग देखील तयार होतात, अशातच ग्रहांचा राजकुमार बुध 19 ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे आणि 6 नोव्हेंबरपर्यंत तेथेच राहणार आहे. यानंतर बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. याआधी बुध 22 ऑक्टोबरला स्वाती नक्षत्रात आणि 31 ऑक्टोबरला विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. दरम्यान, नोव्हेंबरपर्यंत बुधाचे तूळ राशीत राहणे अनेक राशींसाठी फलदायी ठरणार आहे.

ज्योतिषशास्त्रात बुधला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. बुध मिथुन आणि कन्या राशीचा शासक ग्रह मानला जातो. बुध हा व्यवसाय, बुद्धिमत्ता, विवेक आणि वाणीचा कारक आहे, अशा स्थितीत बुध जेव्हा-जेव्हा आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर चांगला आणि वाईट असा प्रभाव पडतो. अशातच बुधाचे तूळ राशीतील प्रवेश काही खास असणार आहे कारण तूळ राशीत आधीच सूर्य, केतू आणि मंगळ विराजमान आहेत. अशा स्थितीत मंगळ, सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे तूळ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होईल आणि सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होईल, ज्यामुळे अनेक राशींचे भाग्य उजळेल.

मिथुन

तूळ राशीतील बुधाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरणार आहे, कारण मिथुन राशीचा अधिपती ग्रह बुध आहे. या काळात आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. लोक नवीन घर, नवीन कार किंवा नवीन प्लॉट खरेदी करू शकतात. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेळ उत्तम आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे, अशास्थितीत तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम वाढेल. आरोग्य चांगले राहील. नवीन मालमत्तेत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

धनु

तूळ राशीत बुधाचे संक्रमण राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय उत्तम राहील. व्यवसायात प्रगती आणि विस्तार होईल, आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरी किंवा बढतीचा लाभ मिळू शकतो. व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अडकलेला पैसा मिळेल. कामात यश मिळेल. लांबलेली कामे पूर्ण होतील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. भौतिक सुख-सुविधा वाढतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

मकर

तूळ राशीत बुधाचा बदल शुभ होणार आहे. करिअरमध्ये नवीन उंची प्राप्त होईल आणि व्यवसायात फायदा होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. तुळ राशीत तयार झालेल्या चतुर्ग्रही योगामुळे आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील, काही मोठे व्यावसायिक व्यवहार होऊ शकतात. नोकरदार लोकांना नवीन नोकरी, बढती आणि वेतनवाढीचा देखील लाभ मिळू शकतो. स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून चांगला नफा मिळू शकतो. सहलीला जाऊ शकतात. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप भाग्यवान ठरेल. शासक ग्रह असल्याने बुध ग्रहाचा विशेष आशीर्वाद राहील. तुम्हाला अनपेक्षित धनाचा लाभ मिळू शकतो. व्यवसायात मोठा फायदा होईल. आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. करिअर: मीडिया, मार्केटिंग, शिक्षण आणि भाषणाशी संबंधित लोकांसाठी वेळ अद्भुत सिद्ध होऊ शकतो. या काळात सगळ्या इच्छा पूर्ण होतील. अडकलेला पैसाही वसूल होईल. जीवनात सकारात्मक बदल होतील. नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe