Healthy Summer Drink : सध्या सर्वत्र तापमान वाढले आहे. अशास्थितीत आरोग्याची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. कारण उन्हाळ्यात अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो, यातील एक सामान्य समस्या म्हणजे डिहायड्रेशन. डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशास्थितीत उन्हळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे.
स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी पिले पाहिजे, पाण्यासोतच अनेक पदार्थांचे सेवन केले पाहिजे, तुम्ही पाण्यासोबत मिठाचे देखील सेवन करू शकता. ज्यामुळे तुम्ही डिहायड्रेशनची समस्या सहज टाळू शकता.

मीठ, विशेषत: सोडियम क्लोराईड, शरीरातील द्रव संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावते. उन्हळ्यामुळे जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा आपण शरीरातील फक्त पाणीच गमावत नाही, तर सोडियम सारख्या आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील गमावतो.
अशास्थितीत शरीरातील पाणी टिकवून ठेवण्याची पाण्यात मिठी मिसळून पायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी वाढते ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या टाळता येते. याशिवाय तुम्ही अनेक पेय पिऊ शकता, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या टाळता येईल. तुम्ही लिंबू पाणी, नारळ पाणी, शिकंजी किंवा इतर पौष्टिक पेये पियू शकता.
टीप : लक्षात घ्या जास्त प्रमाणात मीठ पाणी पिणे टाळले पाहिजे, यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, म्हणूनच कोणत्याही पदार्थाचे नियमित प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुसार होणार नाही.