Money Plants : पृथ्वीतलावर अशी अनेक झाडे आहेत, जी हिंदू धर्मात खूप पवित्र मानली जातात. ज्योतिषशास्त्रातही काही झाडे व वनस्पतींना अनन्य साधारण महत्त्व आहे. काही झाडे आणि वनस्पती खूप चमत्कारिक मानल्या जातात. ही झाडे घरात किंवा घराच्या आसपास लावणे शुभ मानले जाते. संपत्ती, समृद्धी आणि सन्मान वाढविण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही झाडांचा उल्लेख केला आहे. ही झाडे किंवा वनस्पती आपल्या घरात लावल्या तर नोकरी, व्यवसायात स्थिर संपत्ती व समृद्धी मिळते. अशी कोणती झाडे आहेत, तेच आपण या बातमीतून पाहूयात…
1. तुळशीचे झाड
हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाची वनस्पती म्हणजे तुळशीचे रोप. घरात किंवा अंगणात तुळशीचे रोप खूप पूजनीय मानले जाते. हे रोप घराच्या उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते. गृहीणी दररोज या झाडाची पूजा करतात. घरात तुळशीचे रोप असल्याने जीवन आनंदी आणि शांत राहते. अनेक प्रकारच्या समस्या दूर राहतात. तुळशीचा संबंध भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीशी असल्याने हे झाड घरात स्थिर लक्ष्मी ठेवते.

हे पण वाचा : जून महिन्यांत सेनापती राजाच्या घरी जाणार; ‘या’ 5 राशींसाठी मोठा राजयोग
2. शमीचे झाड
घराच्या दक्षिण दिशेला शमीचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते. शमी झाडाने शनी देवाच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळते, असे मानले जाते. शिवाय हे झाड घरात सुख-समृद्धी वाढवते. शमीचे झाडामुळे कुटुंबाला भगवान महादेवाचा आशीर्वाद मिळतो असेही सांगितले जाते. हे झाड ज्याच्या अंगणात आहे त्या कुटुंबाला नोकरी आणि व्यवसायात प्रगती साधता येते.
3. कोळी वनस्पती
घरात स्पायडर प्लांट अर्थात कोळी वनस्पती लावल्याने चमत्कारीक फायदे होतात, असेही सांगितले गेले आहे. घराच्या उत्तर, ईशान्य किंवा वायव्य दिशेला ते लावणे खूप शुभ मानले जाते. घरात हे रोप असल्याने आजूबाजूची हवा स्वच्छ राहते आणि आरोग्य देखील मिळते. हे रोप अनेक प्रकारचे आजार दूर ठेवते. सकारात्मक ऊर्जा देऊन हे झाड नोकरी व व्यवसायात प्रगती करते, असे मानले जाते.
हे पण वाचा : 15 जूनपर्यंत ‘या’ 3 राशींना मिळणार धन,यश आणि सन्मानाची भेट
4. मनी प्लांट
घरात मनी प्लांट असणे चांगले मानले जाते. त्याच्या नावाप्रमाणेच, हे रोप पैशाशी संबंधित समस्या दूर करते. हे रोप जसजसे वाढते तसतसे संपत्ती आणि सन्मान देखील वाढू लागतो. मनी प्लांट घरात नशीब वाढवते आणि जीवनात नवीन ऊर्जा आणते. नोकरी किंवा व्यवसायात कायम प्रगती करायची असेल, तर घरात मनी प्लॅन्ट लावण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात सांगितला जातो.
5. अपराजिता वनस्पती
तुळशीप्रमाणेच अपराजिता वनस्पती खूप पवित्र मानली जाते. या वनस्पतीच्या वेलीचा फायदा घेण्यासाठी ती घराच्या पूर्व, उत्तर, ईशान्य दिशेला लावावी. ही वेल देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे मानले जाते. घरात हे रोप असल्याने देवी लक्ष्मी स्वतः घरात वास करते आणि नोकरी आणि व्यवसायात खूप चांगली प्रगती साधता येते. प्रत्येकाच्या घरात अपराजिता असावीच असे सांगितले जाते. या झाडाची फुले जांभळ्या किंवा पांढऱ्या रंगाची असतात.
हे पण वाचा : ‘या’ 3 राशी होणार करोडपती, तुमची राशी आहे का यात?