चंद्रावरील धूळ आणि वाळूचा उपयोग रस्ते तयार करण्यासाठी !

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : चांद्रभूमीवरील धूळ आणि वाळूचा उपयोग रस्ते तयार करण्यासाठी केला जाणार आहे. सूर्यप्रकाशाचा वापर करून चंद्राची माती वितळवून पक्क्या रस्त्यांप्रमाणे अधिक घन पदार्थ बनवण्याचा मार्ग संशोधकांनी शोधला आहे.

चांद्रभूमीवर २०३० पर्यंत महिला आणि पुरुषाला पाठवण्याचा नासाचा प्रयत्न आहे. ही मोहीम फक्त चांद्रभूमीची पाहणी करण्यासाठीची नाही तर या मोहिमेद्वारे चंद्रावर वस्ती करण्यायोग्य मूलभूत सोयी निर्माण करणे अशा अर्थानेही आहे.

भविष्यातल्या इतर ग्रहांवरील मोहिमांसाठी चांद्रभूमीचा वापर विसावा आणि पुन्हा उड्डाणासाठी करण्याचा नासाचा प्रयत्न आहे. त्यासाठी तिथल्या वाळूचा उपयोग रस्त्यांसारखा घनपदार्थ तयार करण्यासाठी केला जाणार आहे.

सूर्यप्रकाश आणि वाळू यांचा वापर करून हे रस्ते बांधण्याची योजना आहे. कार्बन डाय ऑक्साईडच्या मदतीने चंद्रावरील वाळू वितळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सूर्याच्या प्रकाशाचा थेट वापर करणे शक्य असल्यामुळे पृथ्वीवरून अवजड अशी उपकरणे चंद्रापर्यंत नेण्याचा खर्च वाचणार आहे.

जर्मनीच्या अॅलेन विद्यापीठाने ही योजना प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले आहे. यासाठीचे प्रयोग सुरू झाले आहेत. चंद्रावर गुरुत्वीय बल कमी असल्यामुळे उडणारी धूळ ही लवकर खाली बसत नाही. याशिवाय वाळूमुळे तिथे उतरणाऱ्या यानांच्या चलनवलनाला अडथळे निर्माण होतात. रस्ते तयार झाल्यास हे चलनवलन वेगाने होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe