Name Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचे नाव त्याच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. नावाचा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव असतो. माणसाचे नाव हीच त्याची ओळख असते. व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणे, व्यक्तिमत्व आणि भविष्याबाबत अनेक गोष्टी कळू शकतात.
नावाचे पहिले अक्षर खूप महत्वाचे मानले जाते. नावाच्या पहिल्या अक्षरामुळे व्यक्तीच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी कळू शकतात. नावाची अक्षरे ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची मानली जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच नावाच्या अक्षराविषयी सांगणार आहोत, जे नावासोबत आपले नशीब घेऊन येतात. या नावाच्या व्यक्तींकडे कधीही पैशांची कमतरता भासत नाही, त्यांच्याकडे सर्व काही असते, हे लोक खूप भाग्यवान देखील मानले जातात. चला त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया-

A अक्षर
या नावाच्या लोकांचे नशीब अचानक चमकते. सुरुवातीच्या काळात या लोंकाना खूप संघर्ष करावा लागतो, पण जसजसे या लोकांचे वय वाढत जाते तसतसा संघर्षही वाढत जातो पण नंतर त्या संघर्षांचा फायदा त्यांना मिळू लागतो. वयाच्या 30 वर्षानंतर या लोकांचे नशीब अचानक चमकते. त्यांना कधीच पैशांची कमतरता भासत नाही. हे लोक जीवनात चांगले यश मिळवतात. नोकरी करण्याऐवजी व्यवसाय करण्यात ते सर्वाधिक पटाईत आहेत. या लोकांची लव्ह लाईफही चांगली असते पण त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना समाजातही खूप मान आहे.
T अक्षर
या नावाची लोकं जन्मापासूनच नशीब घेऊन येतात. हे लोक जीवनात खूप प्रगती करतात. या लोकांना अभ्यासातही खूप रस असतो. मैत्रीच्या बाबतीतही ते आघाडीवर असतात. त्यांची बर्याच लोकांशी मैत्री आहे आणि ते त्यांची मैत्रीही उत्तम निभावतात. त्यांना ऐशोआरामाने आयुष्य जगायला आवडते. या नावाच्या लोकांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होतात. हे लोक स्टायलिश आणि दिसायला चांगले असतात. ते इतरांना पटकन स्वतःकडे आकर्षित करतात. पैसा त्यांच्याकडे स्वतःहून येतो. हे लोक खूप भाग्यवान देखील मानले जातात. जेव्हा प्रेमाचा प्रश्न येतो तेव्हा ते थोडे नखरे नदाखवतात. हे लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत त्यांच्या भावना शेअर करू शकत नाहीत.













