आता Amazon ने लॉन्च केला Amazon Fire HD 10 (2023) टॅबलेट , एकदम कमी किमतीत जबरदस्त फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:
Amazon Fire HD 10 (2023)

Amazon Fire HD 10 (2023) : Amazon ने आपल्या Fire सीरिजमधील लेटेस्ट अफॉर्डेबल टॅबलेट लाँच केला आहे. या कंपनीचा हा नवीन टॅबलेट Amazon Fire HD 10 (2023) आहे, जो फायर एचडी 10 (2021) चा अपग्रेड व्हर्जन आहे.

हे डिव्हाइस कोणत्याही अधिकृत लाँचशिवाय अॅमेझॉनच्या वेबसाइटवर लिस्टेड केले आहे. या टॅब्लेटमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. कंपनीचा दावा आहे की, हा टॅबलेट 13 तासांची बॅटरी लाइफ देईल. लेटेस्ट Amazon Fire HD 10 (2023) टॅब्लेटच्या किंमती आणि फिकेचर्स आपण जाणून घेऊयात –

Amazon Fire HD 10 (2023): किंमत व उपलब्धता

Amazon Fire HD 10 (2023) टॅब्लेट 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. लॉकस्क्रीन एड्ससह येणाऱ्या या दोन व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 139.99 डॉलर (अंदाजे 11,600 रुपये) आणि 179.99 डॉलर (अंदाजे 15,000 रुपये) आहे.

जर आपल्याला टॅब्लेटवर ऍड नको असतील तर आपल्याला या दोन टॅबसाठी अनुक्रमे $ 154.99 (अंदाजे 12,800 रुपये) आणि $ 194.99 (अंदाजे 16,200 रुपये) द्यावे लागतील. हा टॅब ब्लॅक, लिलॅक आणि ओशन कलरमध्ये उपलब्ध आहे.

Amazon Fire HD 10 (2023) स्पेसिफिकेशन्स

Amazon फायर एचडी (2023) टॅब्लेटमध्ये मागील जेनरेशन च्या टॅब्लेटच्या तुलनेत अनेक सुधारणा आहेत. टॅब्लेटमध्ये 10.1 इंचाचा फुलएचडी डिस्प्ले आहे. या टॅब्लेटमध्ये चारही बाजूंनी मोठे बेजल्स आहेत. या बेजल्सच्या मदतीने टॅब्लेट पकडणे सोपे होईल.आणि चुकून टच होण्याच्या घटना कमी होतील.

Amazon फायर एचडी 10 (2023) मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, ज्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. नवीन टॅबलेट आधीच्या व्हेरियंटपेक्षा 25 टक्के वेगवान असल्याचा दावा केला जात आहे. टॅब्लेटमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. नवीन Amazon टॅबलेट मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत स्टोरेज सपोर्ट करतो.

या टॅब्लेटमध्ये 5 मेगापिक्सलचा रिअर आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 2021 मध्ये लाँच झालेल्या मॉडेलमध्ये 2 मेगापिक्सलचा कॅमेरा होता. टॅब्लेटची बॅटरी क्षमता सध्या माहित नाही. परंतु कंपनीने रीडिंग, ब्राउझिंग, व्हिडिओ पाहणे आणि संगीत ऐकणे यासह 13 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅबलेट 9 वॉट चार्जिंग स्पीडला सपोर्ट करतो आणि पूर्ण चार्ज होण्यास सुमारे 4 तास लागतात. Fire HD 10 (2023) सोबत Amazon Stylus Pen देण्यात आला आहे. Fire HD Max 11 नंतर हा दुसरा फायर टॅबलेट आहे जो स्टायलस सपोर्टसह येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe