Numerology : खूप भाग्यवान असतात ‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली; लग्नानंतर चमकवतात पतीचे भाग्य !

Ahmednagarlive24 office
Published:
Numerology

Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर खोल प्रभाव पडतो. ग्रहांच्या हालचालींमुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ असा परिणाम दिसून येतो. तथापि, ज्योतिषशास्त्रामध्ये या सर्व गोष्टींना सामोरे जाण्याचे मार्ग देखील आहेत. 

दरम्यान, अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची महत्त्वाची शाखा आहे. ज्यामध्ये व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उल्लेख आहे, अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, वागणूक, भविष्य, तसेच खूप काही जाणून घेता येते. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतार तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेता येतात.

उदारहणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक 9 असेल. त्याचप्रमाणे सर्व तारखा जोडल्या जातात. आज आम्ही तुम्हाला महिन्याच्या 2, 11 आणि 20 तारखेला जन्मलेल्या महिलांबद्दल सांगणार आहोत. या तारखेला जन्मलेल्या महिलांचा मूलांक 2 असतो. या महिला केवळ जोडीदारासाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी खूप भाग्यवान असतात.

मूलांक 2 महिलांचा स्वभाव

-मूलांक 2 असेलेल्या महिलांना खूप भाग्यवान मानले जाते. या महिलांचे नशीब इतके बलवान असते की, या महिला त्यांच्या जोडीदाराच्या आयुष्यात खूप लकी मानल्या जातात. तसेच त्या त्याच्या जोडीदाराला एक उंचीवर नेण्यास मदत करतात.

-या महिला स्वभावाने खूप भावनिक असतात आणि लवकर त्यांच्या जोडीदारासोबत भावनिक बंध तयार करतात. याच कारणामुळे त्या त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात.

-या मुलींना नातेसंबंध कसे हाताळायचे हे चांगले ठाऊक आहे. यामुळेच सासरच्या घरात त्या एक चांगली सून म्हणून ओळखल्या जातात. या व्यक्तींना नाते कसे जपायचे हे चांगले माहित असते.

-या मुली मनापासून थोड्या भावूक असतात आणि सर्व काही मनापासून विचार करतात. या स्वभावामुळे अनेक वेळा लहानसहान गोष्टींचेही त्यांना वाईट वाटते आणि यामुळे त्या कधीकधी मन छोटे करतात.

-या मुली आदर्शवादी असून त्यांना तत्त्वांचे पालन करायला आवडते. या स्वभावामुळे त्या  अतिशय दयाळू आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांची काळजी घेतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe