Numerology Number 2 : खूप बुद्धिमान असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक; कोणत्याही अडचणीतून काढतात मार्ग !

Updated on -

Numerology Number 2 : हिंदू धर्मात जसे कुंडलीच्या आधारे एख्याद्या व्यक्तीचे भविष्य, वर्तमान, तसेच अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याच प्रमाणे जन्मतारखेच्या आधारावर देखील व्यक्तींबद्दल अनेक गोष्टी कळू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार जशी कुंडली पाहुणे व्यक्तीबद्दल माहिती दिली जाते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात देखील व्यक्तीच्या जन्मतारखेच्या सर्व माहिती सांगितली जाते.

अंकशास्त्रात जन्मतारखेच्या आधारावर व्यक्तीची एक मूळ मूलांक संख्या काढली जाते, त्याच्याच आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. जन्मतारखेच्या बेरजेच्या आधारे मिळणाऱ्या संख्येला अंकशास्त्रात मूलांक म्हणतात.

अंकशास्त्रात दिलेल्या उल्लेखानुसार, ही मूलांक संख्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. ग्रहाची स्थिती आणि दिशा यामुळे व्यक्तीच्या जीवनावर समान प्रभाव पडतो आणि त्या आधारावर व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य आणि भविष्य ठरवले जाते. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला ज्या लोकांबद्दल सांगणार आहोत ते खूप बुद्धिमान तसेच खूप हुशार आहेत. चला या लोकांबद्दल जाणून घेऊया.

मूलांक 2

ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे त्यांची मूळ मूलांक संख्या २ असते. आज आपण मूलांक २ असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आणि त्यांच्या जीवनाबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

-जर आपण क्रमांक 2 असलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोललो तर हे व्यक्ती खूप सुंदर असतात. शारीरिकदृष्ट्या सुंदर असण्यासोबतच त्यांचे मनही खूप स्वच्छ असते आणि त्यांच्या मनात लोकांप्रती चांगली भावना असते. ज्यामुळे ही लोकं आयुष्यात खूप पुढे जातात.

-या लोकांची बुद्धी खूप तीक्ष्ण असते. त्यांचे डोके आईनस्टाईनसारखे चालते आणि ते काही मिनिटांत कोणतीही समस्या सोडवण्यास सक्षम असतात.

-नोकरी असो की बिझनेस क्षेत्र, ते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्वत्र नाव आणि सन्मान कमावतात.

-त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्यांच्यात राजकारणी बनण्याचे गुण आहेत. त्यांना कला, संगीत आणि लेखन या क्षेत्रांमध्येही प्रचंड रस आहे आणि या क्षेत्रातही ते नाव कमावतात.

-जर आपण या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर ते नेहमीच मजबूत राहतात. त्यांना कधीही पैशांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत नाही.

-हे लोकस्वभावाने खूपच चांगले असतात पण त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता असते. त्यामुळे त्यांना कोणताही निर्णय घेण्यास वेळ लागतो. पण ते योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!