Grah Gochar 2024 : यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च रोजी आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्री थाटामाटात साजरी केली जाईल. दरम्यान, महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच 7 मार्चला दोन मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत.
या दिवशी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करतील, तर ग्रहांचा राजकुमार बुध या दिवशी मीन राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषात शुक्र हा धन, संपत्ती, सुख आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. बुध हा बुद्धिमत्ता, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन आणि आध्यात्मिक जीवनाचा कारक मानला जातो. दोन्ही ग्रहांच्या संक्रमणामुळे तीन राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे, कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी चला पाहूया…
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचे संक्रमण उत्तम मानले जात आहे. या काळात मिन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. यशाची शक्यता असेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. त्वचा आणि डोळ्यांशी संबंधित समस्या असू शकतात. थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहांच्या भ्रमणाचा खूप फायदा होणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न वाढेल. व्यवसाय आणि गुंतवणुकीतून फायदा होईल. कार्यक्षेत्रात अनेक समस्या निर्माण होतील, परंतु तुम्ही त्या सर्वांचा सामना करू शकाल. प्रवासाची शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल. आर्थिक स्थिती सुधारेल. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी दोन्ही ग्रहांचे संक्रमण शुभ मानले जात आहे. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. वेळेचा योग्य वापर केल्यास फायदा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्वचेशी संबंधित समस्या असू शकतात. काळजी घ्या…