Top 5 Budget Trips | गुड फ्रायडे (18 एप्रिल) ला येणाऱ्या सुट्टीनं एक लांब वीकेंड तुमची वाट पाहतोय. तीन दिवसांच्या या ब्रेकमध्ये प्रवास करून निसर्गाचा आनंद लुटायचा प्लॅन करताय? पण बजेट कमी आहे? मग घाबरू नका – फक्त ₹5,000 च्या आतसुद्धा काही मस्त ठिकाणी फिरून येता येतं. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही भन्नाट डेस्टिनेशनविषयी.
गुड फ्रायडे हा शुक्रवार सुट्टीचा दिवस असल्याने, शनिवारी आणि रविवारी मिळून तीन दिवसांचा परफेक्ट वीकेंड मिळतो. या वेळी मोठ्या बजेटची गरज नाही – 4-5 मित्र मिळून ट्रिप प्लॅन केल्यास प्रवास, राहणं आणि फिरणं यासाठीचा खर्च सहज कमी करता येतो.

आग्रा-मथुरा
जर तुम्ही दिल्ली किंवा उत्तर भारतात राहत असाल, तर आग्रा व मथुरा ही परवडणारी आणि ऐतिहासिक ठिकाणं आहेत. आग्र्यात ताजमहाल, आग्रा किल्ला, फतेहपूर सिक्री पाहता येतात, तर मथुरेत धार्मिक ठिकाणं भेट देता येतात. तीन दिवसांच्या ट्रिपमध्ये दोन्ही ठिकाणं पाहता येतील. खर्च फक्त ₹4,000–5,000 प्रति व्यक्ती.
नैनिताल
थंड हवामान, नयनरम्य तलाव, आणि शांत वातावरण पाहिजे? मग नैनिताल हा बेस्ट पर्याय आहे. येथे तुम्हाला नैनी तलाव, नैना देवी मंदिर, रोपवे आणि बोटिंगचा आनंद घेता येतो. नैनितालजवळील काठगोदाम स्टेशनपर्यंत ट्रेनने पोहोचून तिथून बस किंवा शेअर टॅक्सीने नैनितालला जाता येतं. एकूण खर्च ₹4,500–5,000 च्या आत.
ऋषिकेश
अध्यात्मिक आणि साहसी अनुभव एकत्र हवाय का? मग ऋषिकेशला जा. गंगा आरती, राम झुला, लक्ष्मण झुला पाहता येतात. कमी बजेटमध्ये राहणं, खाणं आणि ट्रॅव्हलिंग करता येतं. जर तुम्ही योग, ध्यान किंवा ट्रेकिंगमध्ये इंटरेस्टेड असाल, तर इथे एक दिवस निवांत घालवा. खर्च ₹3,000–4,500.
लोणावळा
मुंबई किंवा पुण्याजवळ राहत असाल, तर लोणावळा हा परफेक्ट वीकेंड गेटवे आहे. हिरवळ, धबधबे, आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेले राजमाची, भीमाशंकर आणि लोणावळा तलाव येथे भेट देता येते. ट्रेन किंवा कारने प्रवास करता येतो. खर्च ₹3,500–4,500 च्या आत येईल.
किन्नौर (हिमाचल प्रदेश)
थोडं रिमोट आणि शांत ठिकाण हवंय का? मग हिमाचलचं किन्नौर हे उत्तम ठिकाण आहे. निसर्ग, पर्वत, आणि शुद्ध हवा यासाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण वीकेंड ट्रिपसाठी योग्य आहे. गेस्ट हाऊस किंवा होस्टेलमध्ये राहिल्यास खर्च कमी राहतो. खर्च ₹5,000 पर्यंत.