OPPO : आजच्या काळात स्मार्टफोन ही एक गरज बनली आहे. आज बहुतांशी लोक स्मार्टफोन वापरतात. तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. सध्या बाजारात Oppo F17 Pro व Samsung Galaxy A22 5G हे दोन स्मार्टफोन बाजारात आहेत. येथे आपण दोन्ही फोनबद्दल जाणून घेऊयात जेणे करून तुम्हाला योग्य निवड करता येईल.
Oppo F17 Pro
भारतात या फोनची किंमत 19,990 रुपयांपासून सुरू होते. हा फोन अतिशय स्लिम आणि हलका आहे. याची जाडी 7.48 मिमी आहे आणि वजन फक्त 164 ग्रॅम आहे. Oppo F17 Pro मध्ये फुल-एचडी+ रिझोल्यूशनसह 6.43 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले आणि 800nits जबरदस्त ब्राइटनेस देण्यात आला आहे.
दैनंदिन वापर करताना किंवा ऍप्स लोड करताना किंवा Android च्या मेनू सिस्टीममधून नेव्हिगेट करताना Oppo F17 Pro अतिशय स्पीडमचे कार्यरत वाटतो. Oppo F17 Pro MediaTek Helio P95 SoC वापरतो आणि फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये येतो, जे 8GB LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.1 स्टोरेज आहे. 4,015 mAh बॅटरी दीड दिवस टिकते.
Samsung Galaxy A22 5G
Samsung Galaxy A22 5G हा गॅलेक्सी ए सीरिजचा भाग म्हणून सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने बनवलेला मिड-रेंज अँड्रॉइड-आधारित स्मार्टफोन आहे. हा फोन 24 जून 2021 रोजी लाँच करण्यात आला होता. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 90 हर्ट्झ डिस्प्लेसह येतो.
बॅटरी 5000 एमएएच ची आहे, जी आयफोन 13 प्रोच्या बॅटरीपेक्षा 62% मोठी आहे. Samsung Galaxy A22 5G मध्ये 6.6 इंचाचा इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले असून वर व्ही आकाराचा नॉच देण्यात आला आहे. डिव्हाइसची फ्रेम आणि रियर पॅनल प्लास्टिकपासून बनवलेले आहे.
उजव्या बाजूला साइड माउंटेड कॅपेसिटिव्ह फिंगरप्रिंट रीडर आणि मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा फोन 167.2 x 76.4 x 9.0 मिमी असून त्याचे वजन 203 ग्रॅम आहे. मार्केटमध्ये हा फोन ग्रे, व्हाइट, मिंट व वायलेट रंगात उपलब्ध आहे. याची किंमत 17,999 रुपयांपासून सुरू होते.