Weight Loss : सध्या वजन वाढीची समस्या सामान्य बनलीआहे. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन झपाट्याने वाढू लागते. त्याचबरोबर खराब जीवनशैलीमुळेही वजन वाढू लागते. अशातच वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या गोष्टींचा अवलंब करतात. अगदी डाएटपासून ते वर्कआउटपर्यंत अनेक गोष्टी ट्राय करतात. पण असे करूनही लगेच फरक जाणवत नाही.
पण तुम्हाला माहिती आहे का वजन कमी करण्यासाठी भाज्यांपासून बनवलेले ज्यूस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, आणि वजन कमी करण्यास मदत करू शकतात. होय त्यात भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक असते. आजच्या या लेखात वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्यांचा रस पिला पाहिजे हे जाणून घेणार आहोत.

गाजर आणि बीटरूट रस
बीटरूट आणि गाजरचा रस जलद वजन कमी करण्यास मदत करतो. बीटरूटमध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात, जे यकृत डिटॉक्सिफाय करते आणि चयापचय वाढवण्यास देखील मदत करते.
काकडी आणि पालक रस
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात. हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. हे शरीराला डिटॉक्स करण्यास देखील मदत करते. पालकामध्ये फायबर असते, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. हा रस बनवण्यासाठी तुम्ही २ काकड्या, मूठभर पालक आणि लिंबू घालून रस बनवू शकता. चवीनुसार त्यात मीठ घालायला विसरू नका.
हिरव्या भाज्यांचा रस
हिरव्या भाज्यांचा रस बनवण्यासाठी तुम्हाला काकडी, पालक आणि कोबी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी लागेल. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. आणि त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, ज्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. या रसाचे सेवन केल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. यामुळे, तुम्ही तुमच्या पुढील जेवणात कमी अन्न खाण्यास सक्षम असाल. याव्यतिरिक्त, हा रस तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास देखील मदत करेल.