Numerology : अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे. जी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगते, मग त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व शोधणे असो किंवा त्याच्या भविष्याबद्दल असो. अंकशास्त्राच्या मदतीने हे सर्व काही सहज ओळखता येते.
अंकशास्त्र पूर्णपणे जन्मतारखेवर कार्य करते आणि जन्मतारखेच्या आधारे, 1 ते 9 पर्यंतचे मूलांक काढले जातात जे व्यक्तीबद्दल सर्व काही सांगतात. आज आम्ही तुम्हाला मूलांक संख्या 9 बद्दलच्या लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्या व्यक्तींचा जन्म महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला होतो त्यांची मूलांक संख्या 9 असते. जन्मतारखेची बेरीज करून ही संख्या काढली जाते. चला या व्यक्तींबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया…
-9 क्रमांकाचे लोक नेहमी रागावलेले असतात. छोट्या-छोट्या गोष्टींवर त्यांना खूप राग येतो आणि नाराजी व्यक्त करायला सुरुवात होते. नेहमी राग येण्यामागचे कारण म्हणजे शिस्तबद्ध राहणे. शिस्तीमुळे, त्यांना सर्व काही बंधनांसह करणे आवडते आणि जेव्हा लोक ते करू शकत नाहीत तेव्हा त्यांना राग येतो.
-या मूलांकाची लोकं आयुष्यात खूप धन आणि नाव कमावतात. यांना आपले जीवन सुखसोयींनी जगायला आवडते, तसेच हे लोकं पैसे खर्च करण्याच्या बाबतीत कधीही मागे हटत नाहीत. या लोकांना संपत्तीची कमतरता नसते. त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून संपत्तीही मिळते. लग्नानंतर त्यांना सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभही मिळतो.
-या लोकांची इच्छाशक्ती खूप मजबूत असते जी त्यांना यश मिळविण्यात मदत करते. त्यांच्या दृढ निश्चयामुळे ते आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करत पुढे जातात.
-मूलांक 9 असलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात इतर कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप आवडत नाही. त्यांना कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून राहणे आवडत नाही. त्यांना स्वतःचे काम करायला आवडते. त्यांच्यावर कोणी टीका केली तर त्यांना अजिबात आवडत नाही.
-या मूलांकाच्या लोकांना प्रेमसंबंधांमध्ये जास्त यश मिळत नाही. त्यांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत आणि त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असेही म्हणता येईल की या लोकांचे प्रेमसंबंध कायमस्वरूपी टिकत नाही.