Personality Test: नखांच्या आधारे व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसं ओळखायचं? येथे मिळेल संपूर्ण माहिती

Published on -

Personality Test:- आपण अनेकदा व्यक्तीच्या बोलण्यावर, कपड्यांवर, वागणुकीवरून तिच्या स्वभावाचा अंदाज लावतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की, तुमच्या शरीराच्या काही लहान भागांतून विशेषतः नखांमधून तुमचं व्यक्तिमत्त्व उलगडू शकतं? व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये आता विविध बाबींचा समावेश केला जातो आणि त्यात नखांचा आकारदेखील महत्त्वाचा मानला जातो. नखे ही केवळ सजावटीची गोष्ट नसून ती तुमच्या आतल्या स्वभावाचे, दृष्टिकोनाचे आणि मानसिकतेचा आरसासुद्धा असतात.

नखांचा आकार, लांबी, रुंदी, वळण या सगळ्या गोष्टी तुमच्या वर्तनशैलीसंबंधी महत्त्वाची माहिती देतात. जगभरात अनेक तज्ज्ञ आणि अभ्यासक यावर संशोधन करत असतात. शरीरविज्ञान आणि मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं, तर नखांचे निरीक्षण हे एका प्रकारची नॉनव्हर्बल व्यक्तिमत्त्व चाचणी आहे. आता पाहूया की कोणत्या प्रकारच्या नखांमधून काय काय व्यक्तिमत्व उलगडतं.

नखांचा आकार आणि व्यक्तीचे व्यक्तिमत्व

लांबट आणि बारीक नखे

ज्यांची नखे लांब आणि बारीक असतात, ते लोक बहुतेक वेळा सर्जनशील असतात. त्यांचं विचारविश्व खूप खोल असतं. कल्पनाशक्ती जबरदस्त असते आणि ते नेहमी काहीतरी नवीन, हटके विचार करत असतात. हे लोक स्वभावाने खूप सौम्य आणि शांत असतात. त्यांना एकटं राहणं आवडतं आणि ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा आत्मविश्वास आणि आत्मविश्लेषण असतं.

रुंद आणि चौकोनी नखे

अशा प्रकारची नखे असलेले लोक अत्यंत प्रामाणिक, समजूतदार आणि थेट बोलणारे असतात. त्यांच्या मनात जे असतं तेच ते बोलतात. ते कोणत्याही परिस्थितीत आपली भावना व्यक्त करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्यात आत्मविश्वास प्रचंड असतो आणि त्यामुळेच लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येतात. ते व्यवहारिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेतात आणि त्यांना जबाबदारीचं भान चांगलं असतं.

गोलसर आणि छोट्या नखे

गोलसर नखे असलेले लोक मुळातच शांत आणि संयमी स्वभावाचे असतात. त्यांच्या अंतर्मनात एकप्रकारची स्थिरता असते. हे लोक कोणत्याही दबावाखाली घाबरत नाहीत आणि अडचणींना खंबीरपणे सामोरे जातात. त्यांना नव्या गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. अभ्यास, संशोधन, किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी त्यांना अधिक आकर्षित करतात.

त्रिकोणी किंवा टोकदार नखे

जे लोक त्रिकोणी किंवा टोकदार नखे ठेवतात किंवा ज्यांची नखे नैसर्गिकरीत्या अशी असतात, ते बहुतेक वेळा अतिशय महत्वाकांक्षी असतात. त्यांना लवकरच यश मिळवायचं असतं. अशा व्यक्ती धडाडीच्या असतात, स्पर्धात्मक असतात आणि काही वेळा थोडेसे आक्रमकही असू शकतात. ते लवकर चिडतात पण त्यांचं लक्ष ठाम आणि स्पष्ट असतं. स्वतःच्या उद्दिष्टांबाबत ते ठाम असतात.

अनियमित आणि कुरूप नखे

ज्यांची नखे अनियमित किंवा कुरूप वाटतात (खासकरून खालून कुरकुरीत किंवा थोडीशी झीज झालेली), अशा व्यक्ती कधी कधी भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात. त्यांच्या जीवनात चिंता आणि असमाधान जास्त असतं. कधी कधी हे त्यांच्या मानसिक तणावाचंही लक्षण असू शकतं. अशा लोकांना सहकार्याची गरज अधिक असते, आणि त्यांच्याशी सौम्यपणे संवाद साधणं फायदेशीर ठरतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News