…तर हिवाळ्यात रोज डाळिंब खायलाच हवं! डाळिंब खाल्ल्याने मिळतात ‘हे’ 5 फायदे

Published on -

Pomegranate Farming : डाळिंब हे महाराष्ट्रासह भारतातील काही प्रमुख राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. मात्र डाळिंबाची महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड केली जाते. राज्यातील नाशिक, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमधील अनेक भागात डाळिंबाची मोठ मोठ्या बागा आपल्या नजरेस पडतात.

नाशिक जिल्ह्यातील कसमादे हा पट्टा कांदा सोबतच डाळिंबासाठी विशेष प्रसिद्ध आहे. दरम्यान हे महाराष्ट्राच्या भूमीत पिकणार फळ मानवी आरोग्यासाठी देखील मोठे फायद्याचे ठरते. दरम्यान आज आपण डाळिंबाचे असे काही फायदे जाणून घेणार आहोत ज्याबद्दल अनेकांना माहिती नसते.

हे आहेत डाळिंबाचे टॉप पाच आरोग्यदायी फायदे

पचन यंत्रणा सुधारते : ज्या लोकांना पचनाशी संबंधित समस्या असतील त्या लोकांनी आवर्जून डाळिंबाचे सेवन करायला हवे. कारण म्हणजे डाळिंबाच्या सेवनाने तुमची पचन संस्था मजबूत होते. डाळिंब सेवन केल्याने पचन संस्था सुधारत असते. कारण की यामध्ये फायबरचे प्रमाण इतर फळांपेक्षा जास्त असल्याचे तज्ञ सांगतात.

कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत होते : डाळिंब जर रोज खाल्ले तर बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होण्यास मदत मिळते. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते असा दावा केला जातो. नक्कीच ज्यांना आधीच अशी समस्या असेल त्यांनी डाळिंब सेवन अवश्य करायला हवे.

ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करते : डाळिंब हे अगदीच रसाळ आणि चविष्ट फळ आहे. सोबतच हे फळ ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामध्ये असणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी पोषक आहेत. त्यामुळे ज्यांना रक्तदाबाची समस्या असेल त्यांनी डाळिंबाची सेवन नक्कीच करायला हवे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : डाळिंबाचे रोज सेवन केले तर रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांमध्ये याचे सेवन केले पाहिजे. तुम्ही हिवाळ्यात दररोज याचे एक फळ खाल्ले तरी सुद्धा तुमच्या आरोग्याला चांगले फायदे मिळणार आहेत.

कॅन्सरचा धोका सुद्धा कमी होऊ शकतो : डाळिंब खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. तुम्हाला कदाचित हे खोटं वाटेल पण काही अभ्यासांमध्ये असे स्पष्ट झाले आहे की डाळिंबाचे रोज सेवन करणाऱ्या माणसांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका बऱ्यापैकी कमी राहतो.

हृदय स्वस्थ राहते : ज्या लोकांना हृदयाच्या संबंधित समस्या असतात अशा लोकांनी डाळिंबाचे सेवन करायला हवे यामुळे त्यांच्या हृदयाच्या समस्या थोड्याफार कमी होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe