Amazon-Flipkart ला काय करता, त्यापेक्षाही अर्ध्या किमतीत ‘या’ सरकारी साईटवर मिळतायेत प्रोडक्ट

Ahmednagarlive24 office
Published:
Online products

Online products : फेस्टिव सीजन जवळ आल्याने अनेक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स आता ऍक्टिव्ह होतील. अतिशय कमी किमतीत प्रोडक्ट सादर करतील. या वेबसाइट्समध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्ट पहिल्या क्रमांकावर येतात,

यामागचं एक मोठं कारण म्हणजे त्यावर मिळणारी प्रचंड सूट. खरं तर या वेबसाईट्सवर तुम्ही जी काही प्रॉडक्ट्स खरेदी करत आहात त्यावर मार्केटपेक्षा जास्त डिस्काउंट दिला जातो, ज्यामुळे ग्राहकांची बरीच बचत होऊ शकते. मात्र, एक सरकारी वेबसाईट आहे,

ज्यावर सर्व्हेही करण्यात आला असून त्यावरील प्रॉडक्टची किंमत ऑनलाइन शॉपिंग साइट्सच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे आढळून आले आहे. आज आम्ही तुम्हाला या वेबसाईटबद्दल माहिती देणार आहोत.

कोणती आहे ही सरकारी वेबसाइट

Gem नावाचे एक सरकारी ऑनलाइन मार्केटप्लेस आहे, जे अगदी माफक दरात उत्पादने विकण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. या प्लॅटफॉर्मवर ग्राहक दर्जेदार उत्पादने खरेदी करू शकतात. या सरकारी वेबसाईटवर तुम्हाला अनेक प्रकारची उत्पादने मिळतात. वेबसाइटवर देण्यात येणाऱ्या सर्व उत्पादनांची गुणवत्ता जबरदस्त आहे.

किती कमी किमतीत मिळतात प्रोडक्ट

इतर ई-कॉमर्स वेबसाईटच्या तुलनेत शासकीय Gem या पोर्टलवर असे 10 प्रोडक्ट्स आहेत की जे स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जात असल्याचे आर्थिक सर्वेक्षण 2021-22 मध्ये समोर आले आहे. या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही.

किमती कमी असल्या तरी उत्पादनांची गुणवत्ता मजबूत असते. सर्वेक्षणात समोर आलेल्या 10 प्रॉडक्टच्या किमती इतर संकेतस्थळांवर 9.5 टक्क्यांनी अधिक आहेत. त्यामुळे ग्राहकांनी Gem वरून खरेदी केल्यास त्यांची बरीच बचत होऊ शकते.

दिवाळीच्या काळात वाढेल गर्दी

येत्या दिवाळीच्या काळात खरेदी करणाऱ्याची संख्या वाढते. यावेळी अनेक लोक ऑनलाईन मार्केटवर भर देतात. ऑनलाईन खरेदीने अनेक गोष्टींत बचत होते. वेळ व पैसे दोन्हीही बचत होते.

त्यामुळे तुम्हीही दिवाळीत ऑनलाईन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या साईटवर जाऊन तुम्ही स्वस्त दरात खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe