Putrada Ekadashi 2024 : हिंदू धर्मात सर्व एकादशी तिथींना विशेष महत्त्व आहे. यापैकी एक म्हणजे पुत्रदा एकादशी. 21 जानेवारी म्हणजेच आज सर्वत्र पुत्रदा एकादशी व्रत पाळण्यात येणार असून या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत.
या खास दिवशी द्विपुष्कर योग, अमृत सिद्धी योग, शुक्ल योग, ब्रह्म योग, त्रिग्रही योग आणि सार्थ सिद्धी योग यामुळे उपवासाचे महत्त्व आणखी वाढत आहे. एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. पौष महिन्याची पुत्रदा एकादशी काही राशींसाठी खूप शुभ आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांच्यावर कोणता परिणाम होणार आहे, चला पाहूया…
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी यंदाची पुत्रदा एकादशी अतिशय शुभ मानली जात आहे. या काळात वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळू शकेल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी पुत्रदा एकादशी शुभ राहील. नवीन कामासाठी हा काळ उत्तम राहील. भौतिक सुखसोयी वाढतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि आर्थिक संकटातून सुटका मिळेल. करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. तब्येत सुधारेल.
मकर
मकर राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असेल. उत्पन्न वाढेल. शुभ कार्यासाठी हा काळ शुभ आहे. मुलांचा फायदा होईल. व्यवसायाचा विस्तार होईल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी 21 जानेवारी हा दिवस खूप शुभ राहील. धार्मिक कार्याकडे कल वाढेल. विद्यार्थ्यांना फायदा होईल, त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळू शकतील. यंदाची पुत्र एकादशी व्यवसाय आणि करिअरसाठीही शुभ ठरणार आहे. कार्यक्षेत्रात येणारे अडथळे दूर होतील.