सावधान ! मूळ्यासोबत चुकूनही ‘या’ गोष्टींचे सेवन करू नये, नाहीतर…..; तज्ञांनी दिली मोठी माहिती

Published on -

Radish Benefits : तुम्ही पण तुमच्या आहारात मुळ्याचा समावेश करता का ? मग आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरे तर मुळ्याचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.

यामुळे मुळा खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहता येते. ज्यांना डीहायड्रेशन चा त्रास आहे त्यांना मुळ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पचन गॅस आणि ऍसिडिटी सारख्या समस्येत मुळ्याचे सेवन फायद्याचे ठरते.

एवढेच नाही तर मुळा हा पचनासाठी देखील चांगला मानला जातो. मुळ्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. मुळ्यामध्ये फायबर सुद्धा मोठ्या प्रमाणात असते यामुळे वजन कमी करण्यासाठी याचे सेवन चांगले मानले जाते असा दावा केला जातो.

मुळा खाल्ल्याने आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते आणि यामुळे ओवर इटिंग वर कंट्रोल मिळवता येतो. हेच कारण आहे की मुळा हा वजन कंट्रोल करण्यासाठी फायद्याचा ठरतो.

मात्र याच्या सेवनाने काही साईड इफेक्ट सुद्धा होतात. आरोग्य तज्ञ मुळ्याचे सेवन काही पदार्थांसमवेत करू नये असा सल्ला देतात. मुळ्यासोबत काही पदार्थांचे सेवन केले तर याचा आरोग्यावर अपायकारक परिणाम पाहायला मिळतो.

अशा परिस्थितीत आता आपण मुळ्या सोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत जेणेकरून आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

 मुळ्यासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत?

 काही लोक अजाणतेपणे मुळ्या सोबत चुकीच्या पदार्थांचे सेवन करतात आणि यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पाहायला मिळतो. आयुर्वेद एक्स्पर्ट सांगतात की मुळा खाताना दूध आणि दह्याचे सेवन करू नये.

म्हणजे मुळ्या सोबत दूध आणि दही खाऊ नये. हे चुकीचे फूड कॉम्बिनेशन आहे जे की शरीरासाठी घातक ठरू शकते. मुळ्यासोबत दूध किंवा दही याचे सेवन केले तर प्रकृतीवर वाईट परिणाम होतो.

विशेष बाब म्हणजे ज्या लोकांना सर्दी-खोकला, मायग्रेन आणि अस्थामाचा त्रास असेल अशा लोकांनी मुळा खाऊ नये असा दावा करण्यात आला आहे. सामान्य व्यक्तीने सुद्धा मुळ्याचे सेवन प्रमाणातच केले पाहिजे अन्यथा याचा प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe