Rahu Ketu Gochar : 30 ऑक्टोबर रोजी राहू आणि केतू आपल्या चाली बदलणार आहेत. ज्याचा काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येणार आहे. राहु मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. तर केतू तूळ राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रहांच्या या राशीबदलाचा अशुभ परिणाम काही राशींसाठी खूप त्रासदायक असेल.
ज्योतिष शास्त्रानुसार या ग्रहांच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. पण काहींसाठी ते शुभ तर काहींसाठी अशुभ असेल. अशातच या ग्रहांच्या राशी बदलाचा अशुभ परिणाम तीन राशींवर दिसून येणार आहे. या राशींसाठी येणारे वर्ष भरपूर अडचणींनी भरलेले असू शकते. या काळात आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक नुकसान होऊ शकते. तर अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पण काही उपाय केल्याने तुम्ही राहू-केतूचा अशुभ परिणाम तुमच्यावरून काढू शकता, चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
येणारे वर्ष ‘या’ राशींसाठी असेल त्रासदायक !
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी राहू आणि केतूचे संक्रमण अशुभ मानले जात आहे, या काळात लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तसेच या काळात आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचे मतभेद होऊ शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम नाही. गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते. आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. या काळात वाद टाळण्याची गरज आहे. तसेच बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी मायावी ग्रहांचे संक्रमण काही खास राहणार नाही. या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठेही गुंतवणूक करताना तसेच कोणालाही कर्ज देताना विचार करा. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा नाती बिघडू शकतात. आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी राहू आणि केतूचे संक्रमण अशुभ मानले जात आहे. या काळात वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्याबाबत तणाव निर्माण होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ अशुभ आहे. रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच आरोग्याची देखील विशेष काळजी घ्या.
‘या’ उपायांमुळे अशुभ प्रभाव कमी होईल…
-राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी ज्वारी, मोहरी, तीळ, तांदूळ, मूग, कांगुनी, हरभरा आणि गहू, निळे आणि तपकिरी रंगाचे कपडे, गोमेद रत्न, काचेच्या वस्तू बुधवारी रात्री दान करा.
-राहू आणि केतू या ग्रहांना शांत करण्यासाठी घरात शेषनागावर नाचत असलेल्या श्रीकृष्णाचे चित्र लावा. त्याची रोज पूजा करा आणि या दरम्यान “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करा.
-पंचमुखी भगवान शिवासमोर बसून रुद्राक्ष जपमाळ म्हणा. या दरम्यान “ओम नमः शिवाय” मंत्राचा जप करा. असे केल्याने राहू केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो.
-राहू ग्रहाचा प्रभाव टाळण्यासाठी शनिवारी गोमेद रत्न धारण करणे शुभ मानले जाते. केतू ग्रहाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी बुधवारी अश्वगंधा आणि ९ मुखी रुद्राक्ष धारण करावेत.