Rahu Ketu Nakshatra Parivartan : शनिदेवाला हिंदू धर्मात एक महत्त्वाचे स्थान आहे, शनिदेव कर्मानुसार व्यक्तींना फळ देतात. अशातच शनीच्या ग्रहण प्रक्रियेला काल सर्प दोष किंवा शनि साडेसती म्हणतात. त्याचबरोबर राहू आणि केतूलाही धोकादायक ग्रहांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. अशास्थितीत हे ग्रह जेव्हा आपली चाल बदलतात तेव्हा मानवी जीवनावर नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम दिसून येतात.
पण या काळात शनी, राहू आणि केतू यांच्या हालचालींचा काही राशींवर वाइट प्रभाव दिसून येणार आहे. सध्या शनी, राहू आणि केतू यांनी नक्षत्र परिवर्तन केले आहे, ज्याचा काही राशींवर परिणाम दिसून येणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
धनु
राहू आणि केतूचा नक्षत्र बदल धनु राशीसाठी अशुभ ठरणार आहे. या काळात लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. घरातील कोणत्याही सदस्याची तब्येत अचानक बिघडू शकते, ज्यामुळे तुमचे मन अस्थिर राहील. तुमच्याकडे काम नसेल तर घराबाहेर पडणे टाळा. वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा. अन्यथा काही अशुभ घटना घडू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा खूप मोठा काळ असणार आहे. त्यामुळे नीट अभ्यास करण्याची गरज आहे.
मिथुन
राहू आणि केतूचा नक्षत्र बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप जड जाणार आहे. या काळात वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे नातेसंबंधात अंतर आणि कटुता निर्माण होऊ शकते. व्यवसायात तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. जर तुम्ही या महिन्यात कुठेतरी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप अशुभ आहे. या काळात खूप सावध असणे आवश्यक आहे. तसेच बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा अनावश्यक वाद होऊ शकतात.
सिंह
राहू आणि केतूचा नक्षत्र बदल सिंह राशीच्या लोकांसाठी खूप वाईट असणार आहे. या काळात तुमचे पूर्ण झालेले काम बिघडू शकते. याव्यतिरिक्त, तुमचे खर्च वाढतील आणि तुमचे उत्पन्न मर्यादित राहील. त्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढू शकतो आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येईल. अशास्थितीत सावधगिरी बाळगण्याची फार गरज आहे.