Raksha Bandhan 2023 : नात्यांपेक्षा बहीण-भावाचे नाते खूप वेगळे असते. प्रत्येक वर्षी श्रावन महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. शास्त्रामध्ये या पौर्णिमेचा संबंध लक्ष्मी आणि चंद्र यांच्याशी असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा वेळी या दिवशी जर काही उपाय केले तर बहीण-भावामध्ये नेहमी प्रेम राहते.
इतकेच नाही तर अडचणी दूर होतात आणि बहिण भावातील नाते दृढ होते. शिवाय सुख-समृद्धी नांदते आणि त्यांना भाग्याची देखील साथ लाभते. जर असे झाले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. हे लक्षात घ्या की या दिवशी बहिणीला एक काम करावे लागणार आहे.
करा हे उपाय
मिळेल सुख, शांती आणि समृद्धी
रक्षाबंधनाच्या दिवशी गोर-गरिबांना अन्नदान करावं. गाईला हिरवा चारा खायला द्यावा. असे केले तर तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. तसेच जीवनात आनंद वाढत जातो.
सर्वात अगोदर गणपतीला बांधा राखी
समजा भाऊ आणि बहिणीच्या नात्यात काही समस्या असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने सर्वात अगोदर गणपतीला राखी बांधावी आणि त्यानंतर भावाला राखी बांधावी. असे केल्याने भाऊ-बहिणीतील प्रेम वाढत जाते. त्याशिवाय भाऊ आणि बहीण दोघांच्याही आयुष्यामध्ये सुख-समृद्धी येते.
अडथळे होतात दूर
समजा बहिण आणि भावाच्या प्रगतीत अडथळे येत असल्यास रक्षाबंधनाच्या दिवशी पंचमेवा खीरचा उपाय करून पहा. त्यासाठी सर्वात अगोदर देवी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक करून ते नंतर मुलींना पंचमेव खीरचे वाटप करा. असे केले तर या उपायाने करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि संपत्तीतही खूप वाढ होते.
जाणून घ्या धनलाभाचे उपाय
सर्वात आनंदाची बाब म्हणजे रक्षाबंधनाचा दिवस आर्थिक लाभ मिळवण्यासाठी खूप खास असणार आहे. यावर बंधू-भगिनी उपाय करू शकतात. यासाठी बहिणीने अखंड, सुपारी आणि चांदीचे नाणे गुलाबी रंगाच्या कपड्यात ठेवून ते आपल्या भावाला द्यावे. हे बंडल भावाने तिजोरीत ठेवले तर भावाला कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही.