Raw Cabbage : तुम्हीही जेवणासोबत कच्ची कोबी खाता का?, मग जाणून घ्या नुकसान

Content Team
Published:
Side Effects Of Eating Raw Cabbage

Side Effects Of Eating Raw Cabbage : पौष्टिक भाज्यांमध्ये कोबीचा समावेश केला जातो. यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे अँटिऑक्सिडंट्सचा देखील एक चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्याने अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. पण, आजकाल असे दिसून आले आहे की बरेच लोक वजन कमी करण्यासाठी कच्च्या कोबीचे सेवन करतात.

पण तुम्हाला माहीत आहे का कच्ची कोबी खाणे आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नाही. यामुळे आरोग्याला अनेक प्रकारची हानी होऊ शकते. आहार तज्ज्ञांच्या मते, कच्ची कोबी जास्त प्रमाणात खाल्ल्यास दुष्परिणाम दिसू शकतात. आज आपण त्याचे तोटे जाणून घेणार आहोत, चला तर मग…

कच्ची कोबी खाण्याचे तोटे !

कच्ची कोबी पचनासाठी चांगली मानली जाते. त्यात फायबर असते. पण, जर तुम्ही कच्ची कोबी जास्त प्रमाणात खाल्ली तर ते तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. कच्ची कोबी खाल्ल्याने पचायला जड जाते. तसेच पोट फुगणे, गॅस आणि पोटाशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात

-कोबीमध्ये गोइट्रोजन नावाचा पदार्थ आढळतो, ज्यामुळे थायरॉईड ग्रंथीचे कार्य बिघडते. जर एखाद्याला आधीच थायरॉईड असेल तर त्यांनी त्याचे सेवन करू नये. कच्च्या कोबीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास थायरॉईडची स्थिती बिघडू शकते.

-कच्च्या कोबीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचण्यास कठीण असते. कोबी खाल्ल्याने पचनसंस्थेमध्ये गॅस तयार होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे ब्लोटिंगची समस्या उद्भवते.

-जरी एखाद्याला कच्च्या कोबीची ऍलर्जी असेल तर त्याने याचे सेवन करू नये. यामुळे खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. जर तुम्हाला ऍलर्जीची समस्या असेल तर कच्ची कोबी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

टीप : कच्च्या कोबीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यासच अशा प्रकारची समस्या दिसून येते. पण, जर तुम्ही कच्च्या कोबीऐवजी शिजवलेल्या कोबीला तुमच्या संतुलित आहाराचा भाग बनवले तर अशी कोणतीही समस्या नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe