Reduce High Cholesterol : सध्याच्या खराब जीवनशैलीमुळे बऱ्याच आजारांचा धोका वाढला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉलचा धोका वाढला आहे. व्यस्त जीवनशैली आणि खराब आहार यामुळे सध्या बऱ्याच जणांना कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवत आहे. उच्च कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर समस्या आहे आणि जर त्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर यामुळे रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो.
आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल तयार होतात, एक म्हणजे उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) ज्याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि दुसरे म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) ज्याला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. जेव्हा शरीरात वाईट कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा त्याला उच्च कोलेस्टेरॉल म्हणतात. जेव्हा तुमच्या शरीरात वाईट चरबी वाढते, त्यामुळे ते शिरांमध्ये जमा होते. उच्च कोलेस्टेरॉलमुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका असतो. हृदयविकाराचा झटका, आणि निकामी होणे यासारखे गंभीर हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो. अशातच शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी त्यावर वेळीच उपचार केले पाहिजेत.
दरम्यान आज आम्ही तुम्हाला एक घरगुती पद्धत सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. तुम्ही अशास्थितीत ओव्याचा वापर करू शकता.
भारतीय स्वयंपाकघरात ओवा वापर मसाला म्हणून केला जातो. ओवा अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, याला आयुर्वेदात औषध म्हणून देखील वापरले जाते. यामध्ये असलेले गुणधर्म पोटाशी संबंधित समस्या जसे की अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅस इत्यादीपासून मुक्त होण्यास मदत करतात. ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते आणि त्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओव्याचे सेवन खूप फायदेशीर मानले गेले आहे.
उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये ओवा कसा फायदेशीर ?
खरं तर ओव्यामध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि जीवनसत्त्वे यांसारखी पोषक तत्वे आढळतात. याचे नियमित सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होण्यास मदत होते. उउच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी देखील सेवन केले जाऊ शकते. ओव्यामध्ये असलेले थायमॉल आणि क्रोक्रोलसारखे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील वाढलेले लिपिड्स आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करतात. याशिवाय थायमिन, नियासिन, सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्व ओव्यामध्ये आढळतात. जे उच्च कोलेस्ट्रॉल व्यतिरिक्त इतर अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात.
उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये ओव्याचे सेवन कसे करावे ?
ओव्यामध्ये असलेले गुणधर्म शरीरातील वाढलेली चरबी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. याशिवाय दररोज भिजवलेल्या ओव्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलपासून मुक्ती मिळते. पण कोणत्याही आजारात औषध म्हणून ओव्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.