अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2022 :- Relationship Tips : असं म्हणतात की राग हा सुखाचा शत्रू असतो, ज्याला राग येतो त्याला नंतर त्याचा पच्छाताप होतो असे अनेक प्रसंग आहेत की, जर तुम्हाला राग आला नसता तर परिस्थिती वेगळी असती. जर तुम्हाला तुमच्या नात्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा राग येत असेल आणि तुमचे डोके रागाने फुटू लागले असेल तर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवायला देखील शिकले पाहिजे.
रागानेही नाती बिघडतात यात शंका नाही. राग मर्यादेपलीकडे वाढू लागला आहे असे मानणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तर या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.
मुलींसाठी रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी टिप्स
वेळ घ्या :- जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा स्वतःसाठी वेळ काढा आणि शांत बसा. यामुळे तुमचा राग लवकर कमी होईल आणि पुढे काय करायचे किंवा परिस्थिती कशी हाताळायची याचा तुम्ही शांतपणे विचार करू शकता.
गोष्टी मनात ठेवू नका :- जेव्हा माणूस मनात राग ठेवतो, तेव्हा त्याचा राग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघतो. तुमच्या प्रियकराला तुमच्या मनातील गोष्ट सांगा तुम्ही तुमच्या मनात गोष्टी ठेऊ नका अशाने तुमचा राग इतर कोणावरही निघणार नाही.
तणाव कमी करा :- जेव्हा एखादी व्यक्ती खूप तणावाखाली जगू लागते तेव्हा रागही सहज येऊ लागतो. क्षुल्लक गोष्टीमुळे चिडचिडही याच कारणामुळे होते.
बोलण्याआधी विचार करा :- ही खूप ऐकलेली गोष्ट वाटते, परंतु असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला खूप राग आला असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रियकराला काही सांगायचे असेल तर त्याआधी थोडा वेळ नीट विचार करा की त्यांना खरच सांगण्याची गरज आहे की नाही किंवा त्याचे परिणाम काय होतील इत्यादी.
मोजणे :- जर तुम्हाला खूप राग आला तर हळू हळू 1 ते 100 पर्यंत मोजा. यामुळे तुम्हाला आराम करायला वेळ मिळतो.
गाणी ऐकणे :- तुमची आवडती गाणी ऐकून तुम्ही खूप संतापलेल्या परिस्थितीतही शांत होतात. तुमच्या मनाला चांगले वाटते आणि तुमचा राग कमी होऊ लागतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम