Budh Gochar 2024 : बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. हा ग्रह वेळोवेळी आपली हालचाल बदलत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, आध्यात्मिक जीवन, करिअर-व्यवसाय, वाणी, मैत्री, तर्कशास्त्र, बुद्धिमत्ता इत्यादींचा कारक मानला जातो.
जेव्हा-जेव्हा बुध आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम दिसून येतो. दरम्यान, ऑगस्टमध्ये बुध सिंह राशीत उलटी चाल चालणार आहे. बुध ग्रहाची ही चाल अनेक राशींसाठी खूप शुभ राहील. पण काहींसाठी हा काळ अशुभ असेल. आजच्या या बातमीत आपण अशा राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यासाठी हा काळ खूपच खास मानला जात आहे.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची स्थिती अतिशय शुभ असणार आहे. उत्पन्न वाढेल. कार्यक्षेत्रात लाभ होईल. पदोन्नती आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील.
सिंह
सिंह राशीच्या लोकांवरही बुध ग्रहाची विशेष कृपा असेल. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांती राहील. आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची स्थिती देखील शुभ राहणार आहे. व्यवसायात लाभ होईल. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. पदोन्नती मिळू शकते. संपत्ती जमा होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल